शेवळा,भारंगी, टाकळा बाजारात दाखल

  48

तळा : पावसाळ्याला सुरुवात झाल्याने पावसाळी रानभाज्या तळा बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. ज्यामध्ये कुड्याच्या शेंगा,शेवळा,भारांगी टाकला आदी भाज्यांचा समावेश आहे. या भाज्यांचा कोणताही बियाणा नाही आणि त्यांची लागवडही केली जात नाही तर सुरुवातीच्या पावसाच्या पाण्यावर या भाज्या नैसर्गिकरित्या बहरतात.


या भाज्यांचे विविध औषधी गुणधर्म असल्याने बाजारात त्यांना मोठी मागणी असते. कुड्याच्या शेंगा व भारांगी या खायला कडवट असल्या तरी त्यांच्या औषधी गुणांमुळे शरीराला त्याचे मोठे फायदे आहेत. या भाज्यांचा आहारात समावेश केल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.अंगावर असलेले डाग ,खाज, खरूजयांसारख्या अनेक व्याधींवर या भाज्या गुणकारी ठरतात.


या भाज्यांना बनविण्याची देखील वेगवेगळी पद्धत आहे. कुड्याच्या शेंगा,भारंगी, टाकला या भाज्या चिरून शिजविल्या जातात व त्यानंतर त्यांतील पाणी वेळून सुगरणी या भाज्या आपापल्या पध्दतीने बनवितात. परंतु शेवळा ची भाजी विशिष्ट पद्धतीने बनविली जाते. तालुक्यातील आदिवासी महीला पावसाच्या सुरुवातीस जंगलात नैसर्गिकरित्या निर्माण होणाऱ्या या भाज्या विक्रीसाठी घेऊन येतात तसेच या भाज्यांना बाजारात मोठी मागणी असल्याने या महिलांना रोजगार उपलब्ध होतो.

Comments
Add Comment

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत

टेस्ला मुंबईत पहिले चार्जिंग स्टेशन सुरू करणार!

मुंबई : अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन उत्पादक टेस्लाने घोषणा केली आहे की, त्यांचे भारतातील पहिले चार्जिंग स्टेशन