Nashik Car Accident : नाशिकमध्ये भरधाव कार शिरली थेट बंगल्यात; ५ जणांचा मृत्यू

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कळवण-नाशिक मार्गावर आज भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणारी कार थेट रस्त्यालगत असलेल्या बंगल्यात घुसल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर फाट्यावर हा भीषण अपघात घडला. बुधवारी रात्री १० वाजता हा कार अपघात झाला. या अपघातात नामपूर आणि देवळा येथील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू ओढावला. तर २ जण गंभीर जखमी झाले.



चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटले


प्राथमिक माहितीनुसार, नामपूर येथील भदाण कुटुंबियांच्या नातेवाईकाचे नाशिकमध्ये लग्न होते. त्यासाठी भदाण आणि मेतकर कुटुंबिय नाशिकला आले होते. लग्नानंतर हे सर्व जण कारमधून सटाण्याकडे निघाले होते. नाशिक-कळवण महामार्गावर कोल्हापूर फाटा आला तेव्हा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने कार थेट विठोबा शंकर अहेर यांच्या बंगल्यात घुसवली. ही कार बंगल्यात जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला असून बंगल्याचाही काही भाग कोसळला आहे. बंगल्याबाहेरील असलेला सिमेंट खांब वाकून कार आत घुसली. त्यावरून हा अपघात किती भीषण होता हे समोर येते.



या अपघातामुळे भदाण आणि मेतकर कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. अपघात घडताच आजूबाजूच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमधील अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. तर जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईत सिडकोच्या ४ हजार ५०८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध

नवी मुंबई  : सिडकोच्या इतिहासात प्रथमच ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर ४ हजार ५०८ घरांची

नवी मुंबईत वर्षभर वाहतुकीत बदल

खारघर-तुर्भे लिंक रोड भूमिगत बोगदा प्रकल्पाचे काम सुरू नवी मुंबई : सिडकोच्या भूमिगत खारघर-तुर्भे लिंक रोड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत सुट्टी

मुंबई : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबई व मुंबई उपनगर

मेट्रो-११ मार्गिकेला मंजुरी

वडाळा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंतचा प्रवास होणार सुलभ मुंबई  : मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास आणखी सोपा होण्यासाठी

शौर्य पाटील मृत्यू प्रकरणी दिल्ली सरकारची चौकशी समिती

सेंट कोलंबस शाळेच्या चार शिक्षिका निलंबित नवी दिल्ली : दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत दहावीला शिकणारा सांगलीचा १६

चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावात जनआक्रोश!

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या झाल्याच्या