IPO News Update: लवकरच ' हे' दोन आयपीओ गुंतवणूकदारांसाठी दाखल होणार ! मिळवा इत्यंभूत माहिती.....

प्रतिनिधी: जैनिक पॉवर व केबल्स लिमिटेड (Jainik Power and Cables Limited IPO) व सचीरोमी लिमिटेड (Sacheerome Limited) या दोन एसएमई (SME) प्रवर्गतील आयपीओ (IPO) बाजारात लवकरच गुंतवणूकदारांसाठी दाखल होणार आहेत. ९ ते ११ जून कालावधीत सचीरोमी लिमिटेडचा व १० ते १२ मे कालावधीत जैनिक पॉवर व केबल्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. मिळवूया याच दोन्ही आयपीओविषयी माहिती -


१) सचीरोमी लिमिटेड (Sacheerome Limited IPO) - या कंपनीचा आयपीओ बाजारात ९ ते ११ जून कालावधीत गुंतवणूकीसाठी उपलब्ध होणार आहे. हा आयपीओ एनएसई (NSE SME) वर नोंदणीकृत होणार आहे. १६ जून रोजी या आयपीओ बाजारात सूचीबद्ध होणार आहे. कंपनीकडून ९६ ते १०२ रुपये प्राईज बँड (Price Band) निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओसाठी घरगुती किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) साठी कमीत कमी ११५२०० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे ज्यामध्ये २४०० समभाग (Shares) खरेदी करावे लागतील.


हा साधारण ६१.६२ कोटींचा आयपीओ असणार असून त्यामध्ये ६०४०८०० समभागाचे वाटप गुंतवणूकदारांना करण्यात येणार आहे. एकूण आयपीओतील २२.१६ टक्के वाटा अँकर गुंतवणूकदारांसाठी, ३ टक्के वाटा मार्केट मेकरसाठी, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारासाठी (QIB) १४.७८ टक्के, तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी २५.९० टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध करण्यात येईल. यापूर्वीच कंपनीने १७.५४ कोटींची गुंतवणूक अँकर गुंतवणूकदारांकडून स्विकारली आहे.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या महसूलात (Revenue Turnover) मध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील मार्च तिमाहीतील ८६.४० कोटींच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील मार्च तिमाहीत १०८.१३ कोटींनी वाढ झाली आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यात २०२४-२५ मधील १०.६७ कोटींच्या तुलनेत वाढ होत नफा ६१.९९ कोटींवर पोहोचला आहे.


१९९२ साली या कंपनीची स्थापना प्रवर्तक (Promoter) मनोज अरोरा, अलका अरोरा, ध्रुव अरोरा यांनी केली होती. कंपनीचे मुख्य उत्पादन सुगंधी द्रव्ये व तत्सम उत्पादने आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी नवीन प्लांट खरेदी करण्यासाठी व कंपनीच्या दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.


2) जैनिक पॉवर व केबल्स लिमिटेड (Jainik Power and Cables Limited IPO) - जैनिक पॉवर व केबल्स या कंपनीचा आयपीओ १० ते १२ जून कालावधीत एनएसई एसएमई (NSE SME) प्रवर्गात बाजारात दाखल होईल. या आयपीओचा प्राईज बँड (Price Band) १०० ते ११० रूपये प्रति समभाग (Share) निश्चित करण्यात आली आहे. कंपनीच्या माध्यमातून या आयपीओत ४६.६३ लाख समभागांचे वाटप करण्यात येईल. हे शेअर्स अंदाजे १७ जूनपर्यंत बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना या आयपीओत कमीतकमी १२०००० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.


या आयपीओसाठी एकूण आयपीओपैकी १० टक्क्यांपर्यंत गुंतवणूक पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) व किरकोळ गुंतवणूकदारांना (Retail Investors) ना ४४.९७ टक्के वाटा तर विना संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) यांच्यासाठी ४४.९७ टक्के वाटा निश्चित करण्यात आला आहे.


जैनिक पॉवर व केबल्स लिमिटेड ही कंपनी अल्युमिनियम उत्पादने तसेच धातू उद्योगात कार्यरत आहे. शशांक जैन, प्रतिक जैन, अंजू जैन, सुभाष जैन हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. कंपनीच्या एकूण महसूलात आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील ३३९.२३ कोटींच्या तुलनेत वाढ होत २०२५-२६ मध्ये ३५२.३८ कोटींपर्यंत पोहोचला होता. तर कंपनीच्या करोत्तर नफा (Profit after tax PAT) मध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील ५.०२ कोटींच्या तुलनेत वाढ होत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये नफा ९.२४ कोटींवर पोहोचला होता.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर खेळते भांडवल (Working Capital) गरजेसाठी, नवीन प्रकल्प स्थापन करण्यासाठी, जुन्या थकबाकीतील काही निधी चुकता करण्यासाठी, दैनंदिन कामकाजासाठी व इतर खर्च करण्यासाठी करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Sindhudurg : आंबोली घाटात दरड कोसळून दगड रस्त्यावर; वाहतूक मंदावली

सिंधुदुर्ग : पावसाळी पर्यटन हंगामाला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना आंबोली घाटात मुख्य धबधबा

Akola Murder Case: धक्कादायक! अकोल्यात 29 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; अनैतिक संबंधाच्या संशयातून खून

अकोला: अकोला (Akola) शहरात जुन्या वादातून 29 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली

Mouni Roy: मला सगळ्यांना सांगायचं की मी गे... अभिनेत्री मौनी रॉयची पहिली प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पती सूरज

Gadchoroli News: जिल्हाप्रमुख पद गेल्याचा संताप; गडचिरोलीतील शिवसेना (उबाठा) कार्यालयात तोडफोड, एसी-पंख्यांसह साहित्य नेल्याचा आरोप

गडचिरोली : गडचिरोलीमध्ये (Gadchoroli) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Kalyan Accident : पत्नीला माहेरी सोडून परतताना काळाचा घाला! घरापासून काही अंतरावर रील स्टार प्रेम भाटीचा अपघाती मृत्यू

Kalyan Accident : कल्याण : कल्याण (Kalyan) शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नीला माहेरी

BMC : नाना शंकरशेठ यांच्या स्मारक उभारणीची प्रतीक्षा संपली, महापालिका स्वनिधीतून उभारणार स्मारक

बांधकामासाठी कंत्राटदाराची अखेर निवड मुंबई (सचिन धानजी) : आधुनिक मुंबईचे शिल्पकार, शिक्षणप्रेमी आणि समाजसुधारक