मुसलमानबहुल मोरोक्कोत बकरी ईदच्या तोंडावर प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी

  105

मोरोक्को : मुसलमानांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरोक्को या देशात प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आली आहे. मोरोक्कोमध्ये ९९ टक्के मुसलमान वास्तव्यास आहेत. यामुळे मोरोक्कोमध्ये बकरी ईदच्या उत्साहाने तयार सुरू होती. आयत्यावेळी मोरोक्कोचे राजे मोहाम्मेद सहावे (Mohammed VI of Morocco) यांनी देशात प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी घातली आहे. यंदा बकरी ईद निमित्त संपूर्ण देशाच्यावतीने राजे एकटेच बकऱ्याचा बळी देतील, असेही जाहीर करण्यात आले आहे.

मोरोक्को सध्या दुष्काळ आणि आर्थिक आव्हानांशी संघर्ष करत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कमी होत चाललेल्या पशुधनाचे जतन करण्यासाठी कठोर निर्णय घेतल्याचे मोरोक्कोच्या राजाच्यावतीने सांगण्यात आले. मोरोक्कोचे राजे मोहाम्मेद सहावे यांनी देशात प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. हा आदेश जारी होताच मोरोक्कोच्या प्रशासनाने बळीच्या प्राण्यांची विक्री रोखण्यासाठी पशुधन बाजार बंद करण्यास सुरुवात केली. मोरक्कोतील प्राण्यांची खरेदी - विक्री ठप्प झाली आहे.

प्राण्यांचे सौदे करण्यासाठी भरवले जाणारे आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. प्राण्यांच्या विक्री किंवा कत्तलीशी संबंधित मेळाव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मोरोक्कोच्या राजाचे सैनिक आणि पोलीस घरोघरी जाऊन तपासणी करुन कत्तलीचे प्राणी आढळल्यास जप्त करत आहे. महानगरपालिकांच्या कत्तलखान्यांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. मोरक्कोतच काही ठिकाणी प्राण्यांच्या कत्तलीच्या अवजारांच्या विक्रीवरही बंदी आहे.

मोरोक्कोमध्ये मागील सहा वर्षांपासून दुष्काळ आहे. या दुष्काळामुळे नागरिक प्राण्यांची कत्तल करुन त्यांचे मांस खाऊन जगत आहेत. यामुळे देशातील पशुधनात लक्षणीय घट होऊ लागली आहे. या पार्श्वभमीवर मोरोक्कोच्या राजाने पशुधनाच्या संरक्षणासाठी देशात प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी घातली आहे. यंदा बकरी ईद निमित्त संपूर्ण देशाच्यावतीने राजे एकटेच बकऱ्याचा बळी देणार आहे. पण राजाच्या या निर्णयामुळे मोरोक्कोतील धर्मांध मुसलमान असलेल्या नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. राजाने थेट धर्मात हस्तक्षेप करणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment

Trump Tarrif: ट्रम्प यांना घरचा आहेर! अमेरिकन न्यायालयानेच टॅरिफला केले बेकायदेशीर घोषित

ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांना मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयात घेणार धाव वॉशिंग्टन डीसी:  ट्रम्प टॅरिफमुळे

दक्षिण कोरियात शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी

सियोल : दक्षिण कोरियामध्ये शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर झाले आहे. मार्च २०२६ पासून हा कायदा

लंडनमध्ये भारतीय रेस्टॉरंटला आग; पाच जण जखमी

लंडन: लंडनमध्ये एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आग लावल्याची धक्कादायक घटना समोर

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य

न्यूयॉर्कमध्ये भारतीयांना घेऊन जात असलेल्या बसला अपघात, पाच ठार

न्यूयॉर्क : अमेरिकेतून एक दुःखद बातमी आली आहे. न्यूयॉर्क राज्य महामार्गावर एका बसचा अपघात झाला. नायगरा

अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांवर धोक्याची टांगती तलवार, नियमांचे उल्लंघन केल्यास रद्द होणार व्हिसा

वॉशिंग्टन: अमेरिकेत स्थायिक झालेले किंवा तिथे व्हिसावर वास्तव्यास असलेल्या ५.५ कोटी परदेशी नागरिकांच्या