एमएमआरडीने हरित वाटचालीत गाठला महत्त्वाचा टप्पा

  48

जागतिक पर्यावरण दिनी दोन मेट्रो मार्गिकांना मिळाले कार्बन-न्यूट्रल प्रमाणपत्र


मुंबई  : जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) पर्यावरण शाश्वततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एका विशेष सोहळ्यात मुंबई मेट्रो २ए आणि ७ या मार्गिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्बन न्यूट्रॅलिटी आणि कार्बन क्रेडिट प्रमाणपत्रे औपचारिकरित्या प्रदान करण्यात आली. या सोहळ्यासाठी मुख्य सचिव, सुजाता सौनिक, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ.संजय मुखर्जी आणि महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक, रुबल अगरवाल हे मान्यवर उपस्थित होते.


या ऐतिहासिक कामगिरीतून मेट्रो २ए आणि ७ या मार्गिका कार्बन-न्यूट्रल कॉरिडॉर असल्याचे अधोरेखित होते आणि हरित व शाश्वत नागरी वाहतुकीकडे वाटचाल करण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना यामुळे अधिक चालना मिळते.एमएमएमओसीएलने या मार्गिकांची कार्बन न्यूट्रॅलिटी तपासण्यासाठी तृतीयपक्षीय लेखापरीक्षण सुरू केले होते. या लेखापरीक्षणामध्ये या मार्गिका पीएएस २०६०:२०१४ या आंतरराष्ट्रीय मानकानुसार कार्बन न्यूट्रल असल्याचे स्पष्ट झाले.


याशिवाय, 'मेट्रो २ए मार्गिका आणि मेट्रो ७ मार्गिकांसाठी वाहतूक पद्धतीतील परिवर्तन' या प्रकल्पासाठी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२४ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी युनिव्हर्सल कार्बन रजिस्ट्रीने एमएमएमओसीएलला ८५,८४९ कार्बन ऑफसेट युनिट्स जारी केली आहेत. पुढील टप्प्यात, एमएमआरडीएने मेट्रो २बी, ४, ४ए, ५, ६, ७ए आणि ९ या बांधकामाधीन मार्गिकांची VEERA कार्बन रजिस्ट्रीत नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.


ही संस्था हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक स्तरावरील प्रमुख मानक मानली जाते. हे पाऊल उचलल्याने हवामान बदल लक्षात घेऊन राबवली जाणारी पर्यावरणपूरक शहरी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात मुंबई हे देशातील आघाडीचे शहर म्हणून पुढे येत आहे. कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणजे वातावरणात सोडल्या जाणाऱ्या कार्बनचे प्रमाण व त्याची भरपाई करणाऱ्या प्रकल्पांमधून मिळणारे कार्बन क्रेडिट्स यांच्यात संतुलन साधणे. यामुळे एकूण कार्बन उत्सर्जन 'शून्य' होते. मेट्रो सेवा चालवताना होणाऱ्या उत्सर्जनात प्रामुख्याने वीज वापरामुळे होणाऱ्या उत्सर्जनाचा समावेश होतो.

Comments
Add Comment

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरू ठेवावी

जनता दरबारातील मागणीचा मंत्री मंगलप्रभात लोढा पाठपुरावा करणार मुंबई  : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईतील रेल्वे प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या माथी

एमआरव्हीसीला द्यावा लागणार ९५० कोटी रुपये निधी मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एम. यू.

मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ‘डीजी’ नोंदणी बंधनकारक

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद मुंबई  : कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर ‘डीजी ॲप’वर

Devendra Fadnavis on Mumbai Kabutar Khana : "कबुतरखाने अचानक बंद करू नका", कबुतरांना खुराक देण्याची जबाबदारी बीएमसीचीच...फडणवीसांची सूचना

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कठोर कारवाई सुरू केली होती.

Dattatray Bharane : दत्तात्रय भरणे कृषीमंत्री पदावर; "राज्यात विविध भागांमध्ये फिरा, मी पाठीशी"...फडणवीसांच आश्वासन

‘शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार, निर्णय घेणार’ : मंत्री दत्तात्रय भरणे मुंबई : विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना