५० लाख बांबू वृक्ष लागवडीचा शुभारंभ

भातशेतीपेक्षा बांबूशेती करण्याचे आवाहन


पालघर : संपूर्ण विश्वभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना दुर्गम पालघर जिल्ह्यातील धानिवरी या आदिवासी पाड्यावर अभिनव ५० लाख बांबू वृक्ष लागवडीचा संकल्प प्रत्यक्ष बांबू लागवड शुभारंभ करून करण्यात आला. या कार्यक्रमास राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, राज्याचे पण सहकार व वस्त्र उद्योग सचिव प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड़, उपविभागीय अधिकारी विशाल खत्री, वनसंरक्षक निरंजन दिवाकर, उपजिल्हाधिकारी (मनरेगा) विजया जाधव, धानिवरीचे सरपंच शैलेश कोडा, उद्योगपती दिनेश शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.


जिल्हा प्रशासनाने बांबू लागवडी बाबत चांगला दृष्टिकोन स्वीकारला आहे. बांबूच्या माध्यमातून निश्चितपणे पालघर जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो. ही चळवळ पुढे नेण्यासाठी जी काही शासन स्तरावरून मदत आणि मार्गदर्शन लागेल ते निश्चितपणे देईल अशी ग्वाही यावेळी पाशा पटेल यांनी दिली. बांबू शेती आदिवासींचे आणि शेतकऱ्यांचे जीवन बदलेल. धानिवरी गावाने सहकार्य दाखवून १ हजार बांबू उत्पादक शेतकरी उभे केल्यास आपण केंद्राच्या योजनेतून बांबूचे युनिट याच गावात उभे करू त्याचबरोबर महिला बचत गट आणि स्वयंरोजगाराच्या संधी गावातच निर्माण केल्या जातील. त्यासाठी शक्य झाल्यास गाव देखील दत्तक घेण्याची तयारी असल्याचे पटेल यांनी सांगितले.

Comments
Add Comment

नगराध्यक्ष हरले, मात्र जिल्हाध्यक्ष जिंकले

जिल्ह्यात भाजपचे ९४ पैकी ५० नगरसेवक गणेश पाटील पालघर: पालघर जिल्ह्यात तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या

भाजप नेत्यांचे ‘रायगड’वर विचारमंथन

टिळक भवनात आज काँग्रेसची खलबते वसई : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

मच्छीमारांच्या सर्वांगीण सर्वेक्षणाला गती

वाढवण बंदर प्रकल्प: जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार पालघर : प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या

कुडूसला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा

५२ गावांच्या सुरक्षिततेसाठी गृहविभागाची मंजुरी वाडा : वाडा तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि ५२

पालघरच्या मजुरांचा ‘मस्टर रोल’ राज्यभर पोहोचणार

ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडून उपक्रमाचे कौतुक पालघर : पालघर जिल्ह्यातील मनरेगा योजनेअंतर्गत

एकाच महिला नेत्याला मिळाला प्रथम नागरिकाचा मान!

वसई-विरारमध्ये पाच पुरुष महापौर गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी विराजमान होण्याची संधी