मुंबईत बीकेसीतील सेबी भवनात अजगरांच्या पिलांचा सुळसुळाट

मुंबई : यंदा मान्सूनचे आगमन मे महिन्यातच झाले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली. यामुळे जशी माणसांची तारांबळ उडाली तसेच प्राण्यांची गैरसोय झाली. पावसापासून रक्षणासाठी प्राणी मिळेल त्या जागी सुरक्षित आसऱ्याच्या शोधात गेले. यातून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईच्या बीकेसी परिसरात अर्थात वांद्रे कुर्ला संकुलात सेबी भवनात अजगराची पिल्ले आढळली आहेत. सेबी भवनात पाच दिवसांत अजगराची बारा पिल्ले आढळली आहेत.

पावसाळ्याच्या तोंडावर साप सुरक्षित आसरा शोधतात. नैसर्गिक वातावरणात सुरक्षित ठिकाणी राहणे साप पसंत करतात. पण पावसाचे आगमन मे महिन्यात झाले आणि गडबडलेले सरपटणारे प्राणी वाट फुटेल त्या दिशेने पुढे जात मिळेल त्या जागी आसरा घेऊ लागले आहेत. यातून गोंधळाची स्थितीत निर्माण झाली आहे.

सेबी भवनाच्या आवारात आतापर्यंत अजगराची बारा पिल्ले आढळली आहेत. यापैकी एका पिल्लाचा नकळत वाहनाखाली आल्यामुळे मृत्यू झाला. उर्वरित पिल्लांना रेस्क्यू टीमने मिठी नदीच्या पात्रातील खारफुटीच्या जंगलात सोडले.

 
Comments
Add Comment

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक