सेल्फी घेताना धरणात बुडाला मुलगा, धक्क्याने वडिलांचाही अंत; सिंधुदुर्ग हादरला!

सावंतवाडी : एकीकडे धरणावर फिरायला गेलेला १९ वर्षांचा युवक सेल्फी घेताना पाण्यात बुडाला. तर दुसरीकडे मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच वडिलांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचाही मृत्यू झाला. ही काळीज पिळवटून टाकणारी दुहेरी शोकांतिका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारिवडे-पेडवेवाडी येथे घडली.


क्रिश सावियो संभया (वय १९) हा युवक आपल्या मित्रांसोबत मंगळवारी धरणावर गेला होता. सेल्फी घेताना तोल जाऊन तो धरणाच्या पाण्यात पडला. मित्रांनी गावकऱ्यांना माहिती दिल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. रात्री ११ वाजता क्रिशचा मृतदेह पाण्यावर आढळून आला.



मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच वडील सावियो आग्नेल संभया (वय ४८) यांना तीव्र मानसिक धक्का बसला. मंगळवारपासूनच ते धक्क्यात होते. बुधवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरू असतानाच दुपारी १२ वाजता त्यांचे निधन झाले.


एका दिवसात मुलगा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने संभया कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. क्रिश नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता आणि पुढील शिक्षणासाठी तयारी करत होता. पण नियतीने त्याचे स्वप्न अधुरेच ठेवले.


ही घटना संपूर्ण कोकणात हळहळ व्यक्त करणारी ठरत आहे."एका सेल्फीने एक कुटुंब उद्ध्वस्त झालं", अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांमध्ये ऐकायला मिळत आहे.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे

मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकरांची लाखोंची फसवणूक; नक्की घडलं तरी काय ?

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्ष उसगावकर यांची लाखोंची फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे.

नागपूरचे जिल्हाधिकारी आता नागपूर महापालिकेचे आयुक्त

मुंबई : नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. नागपूर

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या

भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या अध्यक्षपदी दीपक सिंह यांची नियुक्ती

मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे महामंत्री दीपक आजाद सिंह यांची आज पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम