वर्षभरात ३१,८७३ नाशिककरांना श्वानदंश

  43

मनपाच्या निर्बिजीकरण मोहिमेनंतरही मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ‘जैसे थे’


नाशिक : शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच असून, गेल्या वर्षभरात तब्बल ३१ हजार ८७३ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. सामान्य समजुतीप्रमाणे लहान मुले व महिला यांना अधिक लक्ष केले जाते असे वाटत असले तरी, वैद्यकीय विभागाच्या आकडेवारीनुसार प्रौढ नागरिकच यामध्ये अधिक बळी ठरल्याचे अधोरेखित होत आहे.


नाशिक महापालिका २००७ पासून भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी निर्बिजीकरण मोहीम राबवत आहे. या मोहिमेवर गेल्या १७ वर्षांत कोट्यवधींचा खर्च झाला असून सव्वा लाखांहून अधिक कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. मात्र, प्रजनन दर जास्त असल्यामुळे अद्यापही कुत्र्यांच्या संख्येवर पूर्ण नियंत्रण मिळविता आलेले नाही. उघड्यावर टाकलेले अन्न, शहरात सर्रासपणे केली जाणारी उघड्यावरील मांस, मासळी विक्री यामुळे भटक्या कुत्र्यांची केवळ गुजराण होत नाही तर ते हिंस्त्र बनले असून त्यातून श्वानदंशच्या घटना वाढीस लागल्या आहेत.


गेल्या वर्षभरातच तब्बल ३१ हजार ८७३ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद महापालिकेच्या विविध रुग्णालयांतून वैद्यकीय विभागाकडे प्राप्त झाली आहे. कुत्रा चावल्यास ‘रेबीज’सारखा प्राणघातक आजार उद्भवू शकतो. यासाठी श्वानदंशावर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. श्वानदंश झालेल्यांना ही लस इंजेक्शनद्वारे दिली जाते.


गत वर्षभरात श्वानदंश
झालेल्यांना दिलेली रेबीज लस
रुग्णालय लस घेणाऱ्यांची संख्या




  • बिटको रुग्णालय - १६,४५९

  • डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय- ४,७७९

  • इंदिरा गांधी रुग्णालय - २,५९३

  • स्वामी समर्थ रुग्णालय - ६,३०७

  • गंगापूर दवाखाना - ६४३

  • दसक-पंचक दवाखाना - १०९२

  • एकूण - ३१,८७३


भटक्या कुत्र्यांकडून प्रौढच अधिक लक्ष्य


भटकी व मोकाट कुत्र्यांकडून लहान मुले व महिलांना लक्ष्य केले जात असल्याचा सर्वसाधारण समज आहे. मात्र महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडील गेल्या वर्षातील आकडेवारीनुसार लहान मुलांच्या तुलनेत श्वानदंश झालेल्यांमध्ये प्रौढांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे श्वानदंश झालेल्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक आहे.


Comments
Add Comment

स्ट्रॉबेरी पिकाचा पीक विमा योजनेत समावेश

कळवण : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्टा आणि सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा तसेच गुजरात सीमेलगतच्या सापुतारा

'मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी'

मालेगाव : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका

केळीच्या बागांत राहणाऱ्या वाघांना ओळख देण्यात वनविभागाचे अपयश

अनेर - मेळघाट काॅरीडॉर प्रकल्प प्रलंबितच… विजय पाठक जळगाव : जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने वन्यजीव संरक्षण

नाशिक मनपा घेणार आणखी तीनशे कोटींचे कर्ज

महापालिका आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका तयारीला

इगतपुरीतील तीनलकडी पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिक त्रस्त

इगतपुरी : इगतपुरी शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील तीनलकडी पुलाची दुरवस्था झाली असून, या पुलावर मोठ्या

दहिवडमध्ये बिबट्या जेरबंद

नागरिकांमध्ये भीती कायम; आणखी पिंजऱ्यांची मागणी देवळा : देवळा तालुक्यातील दहिवड येथील लवखाड मळ्यामध्ये अनेक