स्तुती: जीवन संगीत

  49

सद्गुरू वामनराव पै


आपल्या जीवनांत परमेश्वराचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. तो आहे म्हणून सर्व चाललेले आहे. तो नाही तर काही नाही ही वस्तुस्थिती आहे. तो दिसत नसला तरी सर्व चाललेले आहे ते त्याच्यामुळे चाललेले आहे. विद्युत ऊर्जा दिसत नसली तरी सर्व चाललेले आहे ते विद्युत शक्तीमुळेच, ती नाही तर सर्व बंद. विद्युत शक्ती, गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा परमेश्वर अनंत पटीने मोठा आहे. इतका तो मोठा असून सुद्धा माझ्यामुळे जग चाललेले आहे असे तो कधीच म्हणत नाही. ज्ञानेश्वरीत सुंदर सांगितलेले आहे,



“आकाशे सर्वत्र वसावे वायूने क्षणभरी उगे नसावे, पावके दहन करावे ही आज्ञा माझी’’


आकाशाने सर्वत्र वसावे. वायूने कधीही थांबू नये, वाहत राहावे. अग्नीने दहन करावे, पृथ्वीने भूमात्रांना धरून ठेवावे ही त्याची आज्ञा आहे. आज्ञा माझी म्हणजे काय? सत्ता माझी. सत्ता म्हणजे काय? सत्ता म्हणजे शक्ती, सत्ता म्हणजे असणे. सत्य, सातत्य असणे म्हणजे सत्. ही सत्ता म्हणजे त्याच्या केवळ अस्तित्वामुळे हे सर्व चाललेले आहे. त्याच्या सत्तेने सर्व चाललेले असते पण तो कधीच कुणाला येऊन सांगत नाही की हे मी केले तुम्ही त्याला काहीही केले तरी तो तुमच्या स्तुतीला भाळत नाही. स्तोत्र म्हटले की तो खूश ही तुमची कल्पना आहे. लोक स्तोत्र म्हणतात कारण त्यांना देव प्रसन्न होईल असे वाटते. ते खरे नाही, कारण असा देव प्रसन्न होत नाही. खरेतर तुम्ही देवाची प्रार्थना करता, विश्वप्रार्थना म्हणता, स्तोत्र म्हणता म्हणजे काय करता? देव म्हणजे काय? हे माहीत नसेल तर त्या स्तोत्राला काहीच अर्थ नाही. देव म्हणजे काय हे आधी कळले पाहिजे. “आधी देवासी ओळखावे, मग तयाचे भजन करावे.’’ आधी हा शब्द महत्त्वाचा आहे. देवाची ओळख नाही, देवाला कधी पाहिलेले नाही. स्तोत्र म्हणणे चांगलेच, ते वाईट नाही. स्तोत्र म्हणत असताना देवाबद्दल काही माहीत नसेल तर त्या स्तुतीला अर्थ काय? खरा देव कसा आहे हे समजून ते केले पाहिजे. खोटी स्तुती व खरी स्तुती यात फरक आहे. एखादा खरेच चांगले गाणे म्हणत असताना त्याची स्तुती केली तर ती खरी स्तुती पण केवळ त्याला बरे वाटावे म्हणून स्तुती करतो ती खोटी स्तुती. खरी स्तुती व खोटी स्तुती यांत फरक काय? देवाची ओळख झाल्यावर देवाची स्तुती करतो तेव्हा ती देवाला जास्त आवडते. देवाची स्तुती का करायची? देव असा आहे की त्याची स्तुती किती करावी? त्याचे कौतुक किती करावे? त्याच्याबद्दल किती बोलावे? याला काहीही मर्यादा नाहीत. प्रत्यक्षात देव हा आहेच तसा हे मला सांगायचे आहे.


 
Comments
Add Comment

मरेपर्यंत अशा लोकांना समाजात मिळत नाही मान, होतो सतत अपमान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या

३ ऑगस्टला ब्रह्म मुहूर्तावर सूर्य आश्लेषा नक्षत्रात करणार प्रवेश, 'या' ५ राशींसाठी येणार आनंदाचे दिवस!

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी आणि नक्षत्रांमधील बदल मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. लवकरच सूर्य

खरी मैत्री काय असते ?

मैत्रीचे नाते या जगात सर्वात सुंदर मानले जाते, कारण या नात्यात रंग दिसत नाही, सौंदर्य नाही, पैसा नाही आणि भेदभाव

Vastu Tips: या दिशेला चुकूनही ठेवू नका पैसे, नाहीतर येऊ शकते आर्थिक संकट

मुंबई: वास्तूशास्त्रानुसार, घरात पैसे कोणत्या दिशेला ठेवले जातात, याला खूप महत्त्व आहे. जर पैसे चुकीच्या दिशेला

१ ऑगस्टला सूर्य-बुध युतीमुळे 'बुधादित्य योग'; 'या' राशींचे नशीब फळफळणार!

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीतील बदल आणि त्यांच्या युतीचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. १

Vastu Tips: 'या' वस्तू कधीही मोफत घेऊ नका, अन्यथा होईल मोठे आर्थिक नुकसान!

मुंबई: आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा आपण काही वस्तू दुसऱ्यांकडून मोफत घेतो किंवा भेट म्हणून स्वीकारतो. पण