घरकुलासाठी ९१,९९१ कुटुंबाचे सर्वेक्षण !

१८ जूनपर्यंत आणखी मुदतवाढ; नागरिकांना मिळणार हक्काचे घर


पालघर : "सर्वांसाठी घरे" शासनाच्या या धोरणाची यशस्वी अंमलबजावणी पालघर जिल्ह्यात होताना दिसून येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ साठी जिल्ह्यातील ९१ हजार ९९१ कुटुंबांचे सर्वेक्षण मे महिन्याच्या अखेरपर्यंत करण्यात आले आहे. या सर्व्हेसाठी केंद्र शासनाने पुन्हा एकदा १८ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील प्रत्येक गावपाड्यातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ६० हजार ६१५ घरकुलांना मंजुरी दिल्यानंतर प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान जनमन या योजनेतून सुद्धा जिल्ह्यात १० हजार ३३४ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.


महत्त्वाचे म्हणजे जनमन योजनेच्या लाभार्थ्यांना २ लाख ३९ हजार रुपये घरकुल बांधकामासाठी देण्यात येणार आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यास मोठा हातभार लागत आहे. घरकुलांची कामे पूर्ण करण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ. रूपाली सातपुते - जठार यांच्याकडून नियमित आढावा घेतल्या जात आहे. दरम्यान आगामी ५ वर्षांत घरकुलासाठी पात्र ठरणारे एकही कुटुंब घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून, प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ चे सर्वेक्षण सर्वत्र करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात ग्रामपंचायत अधिकारी तसेच रोजगार सेवकांकडून ३१ मे पर्यंत ८१ हजार ६३७ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर १० हजार ३५४ नागरिकांनी सुद्धा "सेल्फ सर्वे" केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ९१ हजार ९९१ कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे.


अनुदानात वाढ; नागरिकांमध्ये समाधान
२०२४-२५च्या उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानात ५० हजार रुपयांची अतिरिक्त वाढ शासनाने केलेली आहे. यापैकी ३५ हजारांचे अनुदान हे घरकुल बांधकामासाठी देण्यात येत आहे. तसेच १ किलो वॅट मर्यादेपर्यंत सौर यंत्रणा उभारणी करिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदान व्यतिरिक्त पंधरा हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान घरकुल योजनेचा लाभार्थ्यास देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे घरकुल बांधकामासाठी रोजगार हमी योजनेतून २८ हजार रुपयांची मजुरी दिली जाते. एकंदरीतच पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना आता २ लाख रुपये घरकुल बांधकामासाठी मिळत आहेत. तर जनमन योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी २ लाख शौचालय बांधकामासाठी १२ हजार आणि रोजगार हमी योजनेतून मजुरीसाठी २७ हजार रुपये असे एकूण २ लाख ३९ हजार रुपये मिळत आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वत्र घरकुलांची कामे प्रगतीपथावर असल्याचे चित्र दिसून आहे.


पालघर जिल्ह्यातील अनेक कुटुंब दुर्गम भागात राहतात. त्यामुळे प्रधानमंत्री तसेच जनमन या दोन्ही योजनांमधून घरकुलांची कामे पूर्ण करण्यास प्रशासनाकडून त्यांना पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. भविष्यात एकही गरीब कुटुंब घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून, प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोनचा घरकुल सर्व्हे काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी (भा.प्र.से.) जिल्हा परिषद पालघर.


प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत जवळपास ९२ हजार कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. शासनाने या सर्व्हेसाठी १८ जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे घरकुल योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणाऱ्या प्रत्येक कुटुंबांचे सर्वेक्षण केल्या जाणार आहे. घरकुलाच्या अनुदानात वाढ झाल्याने दोन्ही योजनांच्या मंजूर घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत.
- डॉ. रूपाली सातपुते-जठार, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद पालघर

Comments
Add Comment

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता