७२ तासांत युक्रेनचा रशियावर दुसरा मोठा हल्ला; युक्रेनचा क्रिमिया पूलावर ११०० किलो स्फोटकांनी जोरदार हल्ला

  105

मॉस्को : रशिया-युक्रेन संघर्ष पुन्हा एकदा धगधगू लागला आहे. अवघ्या ७२ तासांत युक्रेनने रशियावर दुसरा मोठा हल्ला करत क्रिमिया पूल पुन्हा उद्ध्वस्त केला आहे. रशिया आणि क्रिमियाला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या पूलाखाली पाण्यात ११०० किलो स्फोटके लावून हा भयंकर हल्ला करण्यात आला.


या पुलावर २०२२ पासून आजवर तिसऱ्यांदा हल्ला झाला आहे. यापूर्वी १ जूनला युक्रेनने ड्रोनद्वारे रशियाचे पाच लष्करी तळ उडवले होते आणि ४१ लढाऊ विमाने नष्ट केल्याचा दावा केला होता.


यूक्रेनच्या सुरक्षा एजन्सी एसबीयूने अधिकृतपणे सांगितले की, मंगळवारी पहाटे ४.४४ वाजता खांबांवर स्फोट घडवून आणले गेले. या हल्ल्यामुळे पूल मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाहतूक थांबवण्यात आली होती.



एसबीयू प्रमुख वासुल मलियूक यांनी याआधी १ जूनच्या हल्ल्यामुळे रशियाचे ७ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचे सांगितले होते. आजचा पूलहल्लाही मलियूक यांच्या देखरेखीखालीच पार पडला.


क्रिमिया पूल म्हणजेच केर्च ब्रिज रशिया आणि क्रिमिया यांच्यासाठी धोरणात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. २०१८ मध्ये बांधण्यात आलेल्या या पूलाद्वारे रशिया क्रिमियाशी लष्करी आणि आर्थिक दृष्टिकोनातून जोडलेला आहे. त्यामुळे युक्रेनसाठी हा पूल नष्ट करणे म्हणजे रशियन पुरवठा व्यवस्था आणि मनोबल दोन्ही उध्वस्त करणे होय.


हा पूल २०१४ मध्ये रशियाने क्रिमिया हडप केल्यानंतर स्थापन केला होता. परंतु युक्रेनसाठी आणि पाश्चिमात्य जगासाठी तो बेकायदेशीर अधिग्रहणाचे प्रतीक ठरतो. त्यामुळेच हा पूल उडवून देणे हे फक्त लष्करी नव्हे, तर राजकीय आणि मानसिक रणधुमाळीतही मोठे पाऊल मानले जात आहे.


युक्रेनच्या या जोरदार प्रतिहल्ल्यामुळे युद्ध पुन्हा तापत असल्याची स्पष्ट चिन्हं आहेत. पुढील काही दिवसांत संघर्ष अधिक गंभीर व निर्णायक वळणावर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

येमेनजवळ मोठी दुर्घटना, आफ्रिकन स्थलांतरितांची बोट बुडाली, ६० हून अधिक जणांचा मृत्यू

सना, येमेन: येमेनच्या किनाऱ्यावर रविवारी एक भीषण बोट दुर्घटना घडली, ज्यात ६० हून अधिक आफ्रिकन स्थलांतरितांचा

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

पाकिस्तानात ५.१ रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये रविवारी (३ ऑगस्ट) भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. पाकिस्तानच्या नॅशनल

'भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही...' डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आता रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवू शकतो,

२५% ट्रम्प टॅरिफचा धोका टळला! एक आठवड्यासाठी दिलासा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली होती, जी १

ट्रम्प यांनी ४१ टक्क्यांपर्यंत लावला टॅरिफ, आदेशावर केली स्वाक्षरी, भारतासह ७० देशांवर होणार परिणाम

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेताना यांनी अनेक देशांच्या वस्तूंवर १० ते ४१