Vat Purnima 2025 : नवविवाहितेचा पारंपरिक शृंगार; वडाची फेरी आणि प्रेमाची गाठ!

  49

हिंदू धर्मात वट पौर्णिमेचे व्रत फार महत्वाचे मानले जाते. सौभाग्यासाठी प्रत्येक विवाहित महिला वटसावित्रीचे म्हणजेच वटपौर्णिमेचे व्रत करतात. पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी तपश्चर्या करून यमाकडून आपल्या पतीला पुन्हा मिळवले होते. त्यामुळे यादिवशी महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सात जन्म हाच पती मिळावा यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात. यंदाची वटपौर्णिमा १० जून २०२५ रोजी आहे. त्यामुळे अनेक नवविवाहित महिला आपल्या पहिल्या व्रतासाठी फार उत्सुक असणार. नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी तर हा दिवस खूपच खास असतो, नव्या नवरीचा साज शृंगार इतर महिलांसाठी आकर्षणाचा विषय असतो. तसेच पूजेला आलेल्या समस्त महिला मंडळाच्या नजरा नववधूकडेच रोखलेल्या असतात. नवीन लग्न झालेल्या मुली आवडीने या सणाची वाट पाहत असतात. तुमची देखील यावर्षी पहिलीच वटपौर्णिमा असेल तर वटपौर्णिमेच्या दिवशी कसा शृंगार करावा याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही तुमच्यासाठी या लेखातून घेऊन आलो आहोत. जेणेकरून ऐनवेळी तुमची गडबड होणार नाही.



१. नववधूची वटपौर्णिमा


लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा असल्याने नवविवाहित महिला फार उत्सुक असतात. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी. घरातील लक्ष्मीला प्रणाम करावा. आपल्या अखंड सौभाग्यासाठी देवतांचे आशीर्वाद घ्यावेत.



२. नऊवारचा थाट


पारंपरिक साडी किंवा नऊवारी साडी नेसावी. रंग निवडताना लाल, हिरवा किंवा सोनेरी रंग वटपौर्णिमेला शुभ मानले जातात. त्यामुळे तुम्ही या रंगाची नऊवारी नेसली तर अतिशय सुंदर लूक दिसेल.



३. अलंकार



वडाच्या पूजेसाठी तयार होताना सर्वप्रथम साज शृंगार करावा. प्रत्येक महिलेला नटायला आवडते. हा दिवस तर विशेष असल्याने यादिवशी महिला आपल्या पतीसाठी सोळा शृंगार करतात. त्यामुळे छान दागदागिने घालावेत. पारंपरिक दागिने असतील तर ते नक्की परिधान करा यामुळे तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडेल. हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र, मांगटिक्का, नथ, कुंडल, हार, बांगड्या, झुमके, कंबरपट्टा, पैंजण व बिचवा यांचा वापर करावा. मांगसिंदूर आणि कुंकू लावणे अत्यंत आवश्यक.



४. केसांची रचना



कोणत्याही पारंपरिक साडीवर तुम्ही अंबाडा बांधून मागून मोगऱ्याचे गजरे गुंडाळा किंवा केसात वेणी घालून फुलांची सजावट करा. जेणेकरून तुमचा लूक परिपूर्ण होईल.



५. मेहंदी



पहिली वटपौर्णिमा आणि आपल्या नवऱ्यावर असणारं प्रेम या दोन्ही गोष्टी हातावरसुद्धा दिसून येतात. मेहंदीला छान असा रंग आल्यावर मुलीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. त्यामुळे हातावर आणि पायांवर सुंदर मेहंदीचे डिझाईन काढू शकता. मेहंदी नववधूच्या रूपाला अधिक आकर्षक करते. तुमचा विवाहित लुक पूर्ण करण्यासाठी, तुमच्या हातावर मेहंदी लावा. आणि त्यात तुमच्या पतीचे नाव नक्की लिहा.



६. पायाची सजावट



काही मुली पायाचे सौंदर्य वाढवण्यासाठी मेहंदी तर काढतातच पण पायाला आलता सुद्धा लावतात. पायात पैंजण घालायला अजिबात विसरू नका. पैंजनमुळे तुमच्या पायाचे सौंदर्य आणखी खुलून दिसेल.



७. मेकअप



वट पौर्णिमेच्या दिवशी चेहरा सुंदर दिसण्यासाठी काही दिवस आधी तुम्ही फेशीयल करून घेणे आवश्यक आहे. हलकासा, पारंपरिक आणि नॅचरल टोनमध्ये मेकअप करावा. डोळ्यांना काजळ, आईलाइनर आणि लिपस्टिक मध्ये गडद पण सुसंगत रंग निवडावा. तुमच्या पारंपरिक पोशाखावर तुमचं सौंदर्य अतिशय सुंदर दिसेल.



८. पूजेचा थाट



नवविवाहित महिलांना वटपौर्णिमा किंवा वट सावित्री व्रत करण्यासाठी व वडाच्या झाडाची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नसते. त्यामुळे वटपौर्णिमाच्या पुजेसाठी कोणते साहित्य लागते त्याची लिस्ट दोन दिवस आधीच तयार करून ठेवा. थोडक्यात, साडीच्या पदरात फळं, फुले, साखर, सुपारी, कुंकू, हळद, वस्त्र ठेवावे. पूजेसाठी वडाच्या झाडाच्या फेऱ्या घेताना साडीचा पदर डोक्यावर नक्की घ्यावा.



९. उखाणा तयार करून ठेवा


वट पौर्णिमेच्या दिवशी नवविवाहित महिलेला साऱ्या सौभाग्यवती गराडा घालतात, आणि तिची चेष्टा मस्करी करताना दिसतात. दरम्यान पतीचे नाव उखाण्यामध्ये घेण्यास सांगतात. अशावेळी गडबड होऊ नये म्हणून, आदल्या दिवशीच काही उखाणे पाठ करून ठेवा.

Comments
Add Comment

बीएमसीच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार शैक्षणिक साहित्य

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बालवाडीपासून ते दहावीपर्यंतच्या साडेतीन लाख

राज ठाकरे लागले कामाला, पक्षात मोठे फेरबदल, ९ जूनला ठाकरेंचा दौरा

पुणे :  पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुण्यात

अभिनेता प्रथमेश परबच्या 'गाडी नंबर १७६०' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत धमाकेदार रहस्य आणि विनोदाची मेजवानी घेऊन येणाऱ्या 'गाडी नंबर १७६०' या

श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके मॅच फिक्सिंगमध्ये दोषी

कोलंबो - श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके याला मॅच फिक्सिंगसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. २०२० मध्ये लंका

भारताच्या AMCA समोर आव्हान कुणाचं? F-47, Su-57 की J-35A?

मुंबई : युद्धात आधुनिक लढाऊ विमानं ही कोणत्याही देशाच्या सैन्याचं प्रतीक मानलं जातं. अमेरिकेचे F-47, रशियाचे Su-57 आणि

लोकलमधून उडी मारल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

मुंबई : पश्चिम रेल्वेवर असलेल्या मुंबई सेंट्रल स्टेशनवर एका २७ वर्षीय प्रवाशाचा चुकीच्या बाजूला उतरण्याच्या