१५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २५० किमीची रेंज
मुंबई: भारताच्या इलेक्ट्रिक वाहन क्रांतीत देशातील आघाडीचा एसयूव्ही उत्पादक टाटा मोटर्सने आज हॅरियर.इव्ही (Harrier.ev) लॉन्च केली आहे. भविष्याच्या एसयूव्हीला मूर्त स्वरूप देण्याच्या उद्देशाने तयार केलेली हॅरियर.इव्ही एक नवीन मानसिकता घेऊन आली आहे, जिच्यात क्षमता आणि आधुनिकता यांचा सुमेळ साधला गेला असल्याचा कंपनीचा दावा आहे. ही अशी एसयूव्ही आहे, जी तुमच्यापुढे साहस आणि शौक यांच्यात निवड करण्याचा पेच टाकत नाही; कारण या एसयूव्हीमधून ते दोन्ही मिळू शकते.
अज्ञात प्रांतात मुशाफिरी करण्यापासून ते शहरी भागात फिरण्यापर्यंत हॅरियर.इव्ही तुम्हाला बेजोड लक्झरीच्या सुरक्षित कोशातून प्रवास घडवते. ५०४ एनएम टॉर्क आणि क्यूडब्ल्यूडी ड्युअल-मोटर सह, हॅरियर.इव्ही एक देशात विकसित करण्यात आलेली आजवरची मुख्य प्रवाहातील एसयूव्ही आहे. नैनीताल नॉक्टर्न, एम्पॉवर्ड ऑक्साइड, प्रिस्टीन व्हाइट आणि प्युअर ग्रे या चार आकर्षक रंगांच्या पर्यायांसह एसयूव्ही समीक्षकांनी वाखाणलेल्या स्टील्थ (STEALTH) आवृत्तीत देखील उपलब्ध असलेल्या हॅरियर.इव्ही ची किंमत २१.४९ लाख रुपयांपासून सुरू होत आहे.
नेक्स्ट जनरेशनच्या ऍक्टि.इव्ही प्लस प्युअर इव्ही आर्किटेक्चर द्वारा संचालित असलेली ही एसयूव्ही एकमेव गाडी आहे. बूस्ट मोडमध्ये केवळ ६.३ सेकंदात ताशी ०-१०० किमी इतका वेग गाठण्याची क्षमता तिच्यात आहे. यामधील सहा प्रगत असे टेरेन मोड आणि असामान्य ग्राउंड क्लियरन्स यामुळे फारसे लोक न पोहोचलेल्या दुर्गम ठिकाणी ही गाडी घेऊन जाता येते. अशा दुर्गम प्रांतात फिरताना देखील गाडीत बसलेले प्रवासी प्रवासी आलिशान झेनिथ स्वीटमध्ये असल्याच्या थाटात राहू शकतील. शिवाय यामध्ये काही फीचर इतकी प्रगत आहेत की, ती केवळ या सेगमेन्टमध्ये किंवा उद्योगात पहिली नाहीत, तर जगात पहिली आहेत.
टाटा मोटर्सद्वारा निर्मित ही सर्वात बुद्धिमान एसयूव्ही आहे. हॅंड्स फ्री अनलॉकिंगसाठी अल्ट्रा वाइड बॅंडचा उपयोग करून डिजी एक्सेस पासून ते ई-व्हॅले, आणि गाडीच्या खाली काय आहे, हे देखील दाखवणाऱ्या ५४०° सराऊंड व्ह्यू सिस्टमपर्यंतची सगळी फीचर्स सामावणारे हे टेक-फर्स्ट उत्पादन फक्त चालकाला मदत करण्यासाठी बनवलेले नाही तर त्याच्याकडून अधिक अपेक्षा करावी इतके ते सक्षम असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. शिवाय, बॅटरी टेक्नॉलॉजीची परिपक्वता आणि मालकीचा सहज अनुभव याबाबतचा आपला विश्वास अधोरेखित करत टाटा मोटर्सने हॅरियर.इव्ही च्या बॅटरी पॅकवर आजीवन वॉरंटी दिली आहे. त्यामुळे EV समुदायाला एक निश्चिंतता मिळू शकते.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. चे मॅनिजिंग डायरेक्टर शैलेश चंद्रा म्हणाले, “हॅरियर.इव्ही च्या लॉन्च सह आम्ही केवळ एक नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करत नाही आहोत, किंवा परंपरेला आव्हान देत नाही आहोत, तर आम्ही काय शक्य होऊ शकते याचे नियम नव्याने लिहीत आहोत. महान परंपरेत जन्मलेली आणि भविष्याचा विचार करून तयार केलेली हॅरियर.इव्ही ही भारताची सर्वात सक्षम एसयूव्ही आहे. अत्याधुनिक ऍक्टि.इव्ही प्लस आर्किटेक्चरने बनलेली आणि सर्वोत्तम टॉर्क निर्माण करणाऱ्या, आणि भारतीय एसयूव्ही क्षेत्रात आजवरचे सर्वश्रेष्ठ अँक्सेलरेशन देणाऱ्या दमदार क्यूडब्ल्यूडीद्वारा संचालित हॅरियर.इव्ही परफॉर्मन्सची नव्याने व्याख्या करते. या जबरदस्त ताकदीला सॅमसंग निओ क्यूएलइडी द्वारा संचालित हरमनचा डिस्प्ले, श्रोत्याला तल्लीन करणारी डॉल्बी अँटमॉस प्रणाली आणि सभोवतालचे आणि अगदी गाडीच्या तळाच्या खालचे देखील दाखवणारी ५४०° सराऊंड व्हयू सिस्टम यांसारख्या एसयूव्ही सेगमेन्टमधील श्रेष्ठ लक्झरीजची जोड आहे.
बुद्धिमत्ता, लक्झरी आणि उद्देशाने प्रेरित होऊन बनवलेली हॅरियर.इव्ही रेंज अँग्झायटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर मर्यादेची चिंता दूर करते आणि इव्हीची मालकी केवळ प्रेरणादायकच नाही, तर सहजसाध्य बनवते. गतीशीलतेच्या भविष्याकडे चालू झालेल्या भारताच्या प्रवासाचे नेतृत्व करण्याची आणि भारतीय ऑटोमोटिव्ह क्षमतेच्या शब्दसंपदेमधून ‘डिलीट इम्पॉसिबल’ करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे हॅरियर.इव्ही आहे.”
हॅरियर.इव्ही ची वैशिष्ट्ये:
ऍक्टि.इव्ही प्लस आर्किटेक्चर द्वारा समर्थित हॅरियर.इव्ही विविध प्रकारच्या प्रांतात बेजोड एक्सेलरेशन, नियंत्रण आणि आत्मविश्वास देते. शहरातल्या दैनंदिन प्रवासापासून ते ऑफ रोडिंग करताना हॅरियर.इव्ही त्यातील प्रगत क्षमता आणि सुपरकार सारख्या परफॉर्मन्ससह एक वेगळा अनुभव देते.
● पुढच्या बाजूस १५८ PS (११६ kW)ची ड्युअल मोटर शक्ती आणि २३८ PS (१७५ kW )
● ड्युअल मोटर सेटअपमधून ५०४ Nm टॉर्क
● ६.३ सेकंदात ०-१०० km/h – सेगमेन्ट मध्ये सर्वश्रेष्ठ
● मोठ्या रेंजचे ६५ kWh आणि ७५ kWh बॅटरी पॅक्स
● C६५ च्या अनुमानानुसार, प्रत्यक्षात ४८०-५०५ किमी रेंज
● १.५ C वर फास्ट चार्जिंगमुळे केवळ १५ मिनिटांत २५० किमी जाण्याची क्षमता मिळते
एसयूव्ही सह कुठेही ऑफ-रोड जाण्याच्या क्षमतेचा आनंद यामुळे अनुभवता येऊ शकतो.
हॅरियर.इव्ही मध्ये ताकदीबरोबर अशी साधने देखील आहेत, जी गाडीत बसलेल्यांना रस्त्यांची चिंता न करण्याचा आत्मविश्वास देतात. शहरातल्या गर्दीतून वाट काढायची असो किंवा ओबडधोबड, खडबडीत रस्त्यावरून फिरणे असो हॅरियर.इव्ही त्यातून मार्ग काढेलच आणि पारंपरिक एसयूव्हीच्या मर्यादांना न जुमानता कुठेही जाईल.
● सहा टेरेन मोड: नॉर्मल, ग्रास/स्नो, मड/ग्रॅव्हेल (खडी), सॅंड, रॉक क्रॉल, कस्टम
● बूस्ट मोड, ड्रिफ्ट मोड आणि क्रूझ नियंत्रणासह ऑफ रोड असिस्ट (ताशी ५ किमी इतका कमी)
● वाहनाच्या खाली काही अडथळा असल्यास तो बघण्यासाठी ट्रान्सपरंट मोड
सेव्हर इंडल्जंट टेक्नॉलॉजी आणि पूर्वी कधीही नव्हती इतकी आलीशान आरामदायकता:
वैशिष्ट्ये -
1. ई-व्हॅले
a. ऑटो पार्क असिस्ट (APA): APA तुमच्या वाहनाला, तुमच्या आदेशानुसार समांतर किंवा लंब स्थानी घेऊन जाते. एनिव्हेअर पार्किंग – या सेगमेन्टमध्ये पहिल्यांदाच आलेले इनोव्हेशन – त्यास एक पाऊल पुढे घेऊन जाते. ते तुम्हाला पारंपरिक ठरलेल्या जागांची गरजेला न जुमानता कस्टम पार्किंग जागा ठरवण्याची मुभा देते. ही पुढच्या पिढीची टेक्नॉलॉजी जेथे पार्किंगसाठी रेषा केलेल्या असतील, तेथेच नाही, तर जेथे सुरक्षित आणि अनुकूल असेल, अशा ठिकाणी पार्किंग करण्याचे स्वातंत्र्य देते.
b. रिव्हर्स असिस्ट: आपसूक रिव्हर्समध्ये नेमका मार्ग आखून देते (अंतिम 50 मीटर पर्यंत), कोणत्याही अडचणीशिवाय तुम्हाला निमुळत्या जागेतून बाहेर काढते.
c. समन मोड: हॅरियर.इव्ही ला दुरूनच पुढे किंवा मागच्या दिशेने बोलावण्यास तुम्हाला मदत करतो. कमी जागा असेल अशा ठिकाणी हा मोड अत्यंत उपयुक्त ठरतो.
2. क्लियर व्ह्यू असिस्ट
a. ५४० डिग्री सराऊंड व्ह्यू
i. ३६० सराऊंड व्ह्यू मॉनिटर: ड्रायव्हिंग करताना सगळ्या बाजूंचा परिसर स्पष्ट बघा. व्यवस्थित बघा, हुशारीने गाडी चालवा आणि आत्मविश्वासाने पार्क करा.
ii. ट्रान्सपरंट मोड: आपल्या गाडीच्या खाली काय आहे हे बघा. ऑफ-रोड प्रदेश असो, खड्डे असोत किंवा काही अवरोध असो, पाहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वासाने आणि नेमकेपणाने नेव्हीगेट करा.
iii. ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर: तुमच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूंच्या ब्लाइंड स्पॉटचा लाईव्ह व्हिडीओ फीड देतो, जो थेट तुमच्या इन्फोटेन्मेंट स्क्रीनवर आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर प्रदर्शित होतो.
b. HD रियर व्ह्यू मिरर (e-IRVM): पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंचा एक सुस्पष्ट व्ह्यू मिळवा, कोणत्याही अवरोधाशिवाय- मग प्रवासी किंवा त्यांचे सामान तुमच्या दृष्टीक्षेपास अवरोधित करत असले तरीही. इंटिग्रेटेड स्मार्ट मिरर एक बिल्ट-इन डॅश-कॅम म्हणून देखील काम करतो, जो निरंतर फुल HD मध्ये रेकॉर्डिंग करतो. समोरच्या बाजूस १९२०x १०८० आणि मागील बाजूस १९२० x३८४. १२८ GB पर्यंतच्या स्टोरेजच्या पाठबळावर तो कित्येक तासांचे ड्रायव्हिंग फूटेज टिपतो. या क्लिप्स शेअर करणे किंवा सेव्ह करणे सोपे आहे. आपल्या फोनवर थेट व्हिडिओ अॅक्सेस करण्यासाठी फक्त मिररवर दिलेला QR कोड स्कॅन करावा लागतो.
3. डिजी अँक्सेस
a. डिजिटल की: हॅरियर.इव्ही सह तुमचा आयफोन,अँपल वॉच किंवा कम्पॅटिबल अँन्ड्रॉईड फोन तुमची स्मार्ट की बनतो. आता प्रत्यक्ष किल्ली सोबत बाळगण्याची गरज नाही. अल्ट्रा वाइड बॅंड (UWB) टेकनिक मुळे वाहन तुम्ही किती जवळ आहात हे ओळखते, त्यामुळे आपल्या डिव्हाईसला हात न लावताच तुम्ही लॉक, अनलॉक आणि ड्राइव्ह करू शकता. हा एक अत्यंत सहज आणि खराखुरा हॅंड्स-फ्री अनुभव आहे. कारच्या हॅंडलवर आपला फोन टॅप करण्याची पूर्वीची आवश्यकता देखील आता उरलेली नाही.
b. स्मार्ट की: तुमची स्लीक, जागा वाचवणारी बॅकअप की तुम्हाला सहजपणे आपली गाडी लॉक करण्याची, अनलॉक करण्याची आणि अगदी सुरू देखील करण्याची सुविधा देते.
c. रिमोट की: यात तुमच्या बोटांमध्येच लॉकिंग आणि अनलॉकिंगपासून ते रिमोट पार्क आणि समन मोड पर्यंतचे 11 शक्तिशाली कमांड आहेत.
4. थिएटर Maax अनुभव
a. सॅमसंग निओ QLED द्वारा संचालित हरमनची ३६.९ सेमी (१४.५३") सिनेमॅटिक इन्फोटेन्मेंट स्क्रीन, जो जगातील पहिला निओ QLED ऑटोमोटिव्ह डिस्प्ले आहे.
b. जगातील पहिला JBL ब्लॅक: दमदार आणि मोक्याच्या जागी बसवलेले १० JBL ब्लॅक स्पीकर JBL ऑडिओ मोडसह एका इमर्सिव्ह अनुभवासाठी ट्यून करण्यात आले आहेत.
c. डॉल्बी अँटमॉस: कलाकाराला अपेक्षित असेल अशा स्पष्टतेने ऐका – गाडीतून फिरताना देखील. एखादा हळुवार बोललेला संवाद असो किंवा गुंतागुंतीचा साऊंडस्केप, प्रत्येक बारकावा समृद्ध स्पष्टता आणि गहिरेपणाने सजीव होतो.
d. कार अँप स्वीटमध्ये Arcade.ev: ड्रायव्हर आणि प्रवासी यांच्याकडे इन्फोटेन्मेंट सिस्टम (२५+अँप) मार्फतच अनेक प्रकारच्या अॅपपर्यंत तत्काळ पोहोच असते. त्यामुळे प्रवासात असताना संगीत, पॉडकास्ट, FM रेडिओ, OTT कंटेंट आणि बऱ्याच गोष्टींचा निर्बाध आनंद घ्या.
5. बिल्ट-इन नेव्हीगेशन –Mappls: अनेक फिचर्सनी युक्त, विस्तृत मॅप्ससह सुरक्षित आणि कुशलतेने नेव्हीगेट करा. हे मॅप झटपट अपडेट होतात आणि ऑफलाइन देखील उपलब्ध आहेत. खास इलेक्ट्रिक वाहनांसाठी डिझाईन केलेल्या या सिस्टममध्ये स्पायडर रेंज व्हिज्युअलायझेशन, बॅटरी-सक्षम रूटिंग आणि आसपासच्या चार्जिंग स्टेशन्सचा रियल-टाइममध्ये शोध यांसारख्या EV-विशिष्ट सुविधा समाविष्ट आहेत. तुमच्या वर्तमान चार्जच्या स्थितीनुसार (SOC) ते तुम्हाला जवळचे चार्जर्स देखील सुचवते आणि ही खातरजमा करते की, तुम्ही सदैव आपल्या पुढील टॉप-अपच्या टप्प्यात असाल.
6. iRA.ev:
a. ५५+ कनेक्टेड कारची वैशिष्ट्ये उदय. कार लोकेशन ट्रॅकिंग, लोकेट चार्ज पॉइंट अॅग्रीगेटर्स, रिमोट ऑपरेशन इ.
b. ड्राइव्हपे: भारतातील पहिल्या इन-कार UPI-आधारित पेमेंट प्रणाली सह खऱ्याखुऱ्या सुविधेचा अनुभव घ्या, जी EV चार्जिंग आणि FASTag साठी सुरक्षित, निर्बाध आणि अनुपालन ट्रान्झॅक्शन सक्षम बनवते. चार्जिंग स्टेशन शोधा, निर्णय घ्या आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा – हे सगळे आपल्या कारच्या इंटरफेसवरून करा, आपल्या फोनचा वापर न करता.
c. ४ वर्षांच्या कॉम्प्लिमेंटरी सब्स्क्रिप्शन सेवांसह
7. ऍक्टि.इव्ही प्लस: टाटा मोटर्सचे ऍक्टि.इव्ही आर्किटेक्चर हर तऱ्हेने प्रगत बनवले आहे. जेणेकरून ते हॅरियर.इव्ही मध्ये ऍक्टि.इव्ही प्लस बनू शकेल.
a. लेयर १: पॉवरट्रेन: QWD आणि RWD चा समावेश, ७५ kWh बॅटरी पॅक, जलद १.५ C चार्जिंग आणि बदलता येणारे टेरेन मोड.
b. लेयर २: चेसिस: FDD सह अल्ट्रा गाइड सस्पेन्शन, अधिक चांगली क्रॅश कामगिरी, उन्नत ड्रायव्हिंग आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग मोड्सची सुरुवात
c. लेयर ३: एलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स: t.idal, टाटा इंटेलिजन्ट डिजिटल आर्किटेक्चर लेयर द्वारा संचालित, यांचे SDV फाऊंडेशन ऍक्टि.इव्ही प्लस आर्किटेक्चरवर बनवण्यात आले आहे. सुरक्षा, मनोरंजन आणि कनेक्टिव्हिटी सहजपणे एकीकृत करण्यासाठी बनवण्यात आलेले t.idal ५०० मिलियनपेक्षा जास्त लाईन्सचे कोड आणि अत्याधुनिक डोमेन नियंत्रकांद्वारे संचालित आहे. निओ QLED ऑटोमोटिव्ह डिस्प्ले, बहुभाषिक व्हॉईस रेकग्निशन आणि Mobileye EyeQ सह ADAS द्वारा संचालित, या उद्योगातील प्रथम हरमन इन्फोटेन्मेंट, ओव्हर-द-एअर अपडेट्स आणि डिजिटल की इंटिग्रेशनपर्यंत, t.idal हॅरियर.इव्ही चे खरोखर एका बुद्धिमान सॉफ्टवेअर-व्याख्यायित एसयूव्ही मध्ये रूपांतर करतो.
d. लेयर ४: क्लाउड आर्किटेक्चर: नावीन्यपूर्ण डिजी अॅक्सेस आणि पूर्वीपेक्षा सुधारित Arcade.ev
झेनिथ स्वीट – लक्झरीची नवी व्याख्या
हॅरियर.इव्ही हा चार चाकांवर चालता-फिरता प्रीमियम लाउंज आहे, जो कम्फर्टला एका नव्या पातळीवर घेऊन जातो. या झेनिथ स्वीटमध्ये अद्भुत डीटेलिंग आणि विचारपूर्वक केलेले एर्गोनॉमिक्स आहे, जे प्रत्येक प्रवासास एक आलिशान अनुभव बनवते.
● मेमरी सीट्स आणि ORVM
● पॉवर्ड आणि हवेशीर फ्रंट सीट्स
● वाढीव रियर लेगरूमसाठी पॉवर BOSS मोड
● रियर कम्फर्ट हेडरेस्ट आणि कप-होल्डर्स सहित सेंटर आर्मरेस्ट
● व्हॉईस असिस्टेड पॅनोरॅमिक सनरूफ
या प्रीमियम सुविधा सोयींची जोड आहे
● कूल्ड स्टोरेज आणि एअर प्युरिफायरसहित ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल
● ड्राइव्ह मोड आणि संगीत यांना अनुरूप आतले लाइटिंग
● वायरलेस चार्जिंग आणि ६५W USB फास्ट चार्जर्स
● प्रायव्हसी आणि प्रकाशाची तीव्र चमक कमी करण्यासाठी रियर सनशेड्स
● व्हेइकल-टू-लोड (V२L) आणि व्हेइकल-टू-व्हेइकल (V२V) पॉवर शेअरिंग
● ५०२ लीटरची बूटस्पेस, जी ९९९ लीटर पर्यंत वाढवता येते.
● RWD मध्ये ६७ लीटर आणि AWD मध्ये ३५ लीटर फ्रंक
टाटा मोटर्सच्या सेफ्टी DNA ला पुढे घेऊन जात, हॅरियर.इव्ही इंटेलिजन्ट असिस्टंस आणि दमदार सुरक्षा फीचर्सची एक व्यापक ईकोसिस्टम प्रदान करते.
● डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर सह HD रियर व्ह्यू मिरर (e-IRVM)
● ७ एअरबॅग्स (६ नेहमीच्या + नी एअरबॅग)
● २० + फीचर्स सह ADAS लेव्हल २
● ५४०° क्लियर व्ह्यू असिस्ट आणि ३६०° ३D कॅमेऱ्यासह ट्रान्सपरंट मोड
रस्त्यावरील सुरक्षा आणि आत्मविश्वासात वाढ:
● i-VBAC सह ESP
● अँकॉस्टिक व्हेइकल अलर्ट सिस्टम (AVAS)
● SOS कॉलचे फंक्शन
● हिल डिसेंट कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट
● TPMS आणि ऑटो हेडलॅम्प सह रेन-सेन्सिंग वाईपर्स