Stock Market Update: सेन्सेक्स निफ्टी सकाळच्या सत्रात 'तेजी' आरबीआयच्या बैठकीवर बाजाराचे लक्ष

  37

प्रतिनिधी: शेअर बाजारात सकाळ सत्राच्या सुरुवातीला आशेचा नवा किरण उगवला आहे. सतत दोन दिवसीय पडझडीनंतर बाजार पुन्हा वधारले. सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच सेन्सेक्स ३१.११ अंशाने वधारला असून निफ्टी २२.५० अंशाने वधारला आहे.त्यामुळे सकाळी सेन्सेक्स ८०७२६.८० व निफ्टी २४५६६.५५ पातळीवर पोहोचला आहे.

आजपासून आरबीआयच्या वित्तीय पतधोरण समितीची ४ ते ६ जून दरम्यान बैठक होणार असल्याने आता बाजारातील वृद्धीकडे सगळ्या बाजाराच्या नजरा आहेत.किंबहुना काल पीएसयु व खाजगी बँकांच्या समभागात (Shares) मध्ये घसरण झाल्यानंतर विशेष लक्ष या समभागावर असू शकते. आज सकाळच्या सत्रातही सेन्सेक्स मिडकॅपमध्ये ११.७५ व निफ्टी मिडकॅप निर्देशांकात ७३.७० अंशाने घसरण झाली आहे.

यंदा तिसऱ्यांदा आरबीआयकडून रेपो दरात (Repo Rate) मध्ये कपात होण्याची शक्यता असल्याने बाजारातील पतनिर्मितीला चालना मिळू शकते.सध्या रेपो दर ६ टक्के आहे यात २५ ते ५० बीपीएस पूर्णांकांने कपात झाल्यास कर्ज स्वस्त होऊ शकतात व गृहनिर्माण संस्थांच्या क्षेत्राला यांचा विशेष फायदा होऊ शकतो.याशिवाय बाजारातील चलनाची तरलता (Liquidity) टिकवण्यासाठी फायदा होऊ शकेल.यामुळेच आजच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे ‌.

सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच बीएससीत (BSE) गार्डन रिच (९.३१%), एसकेएफ (५.३%),कोचीन शिपयार्ड (४.९४%),भारत डायनामिक्स (३.६२%),भारती एअरटेल (१.३१%),टाटा मोटर्स (१.२२%),टेक महिंद्रा (०.७४%),इंडसइंड बँक (०.६४%)या समभागात वाढ झाली आहे.तर स्पार्क (१४.९५ टक्के),एम एम टी सी (३.८%), इंडिया सिमेंट (२.९२%),जेल इंडिया (१.८८%),अदानी पोर्टस (०.५७%),आयसीआयसीआय बँक (०.५५%),सनफार्मा (०.४५%) या समभागात घसरण झाली.

एनएससीत (NSE) सकाळी गार्डन रिच (९.२५%), एसकेएफ इंडिया (५.३७%),सारेगामा इंडिया (५.०७%),भारत डायनामिक्स (३.५२%),भारती एअरटेल (१.६०%),श्रीराम फायनान्स (१.०६%),एम अँड एम (०.७६%),टाटा मोटर्स (०.७१%) या समभागात वाढ झाली असून आदित्य बिर्ला फॅशन (८%),इंडिजीनी (४.६%),इंडिया सिमेंट (२.९६%),जेल इंडिया (१.९१%),अदानी एंटरप्राईजेस (०.९२%), टायटन कंपनी (०.८९%),टीसीएस (०.७०%),एशियन पेंटस (०.५२%),आयसीआयसीआय बँक (०.४५%) या समभागात नुकसान झाले आहे.
Comments
Add Comment

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर