मोहित सोमण: सकाळचा वेग इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने कायम राखल्याने अखेरचे सत्र संपताना शेअर बाजारात किंचित उसळी घेतलेली आढळली.सत्र संपताना आज सेन्सेक्स २६०.७४ अंशाने वधारून ८०९९८.२५ पातळी गाठली तर निफ्टी ७७.७० अंश वधारून २४६२०.२० पातळीवर पोहोचला आहे.आजपासून रिझर्व्ह बँकची पतधोरण समितीची बैठक सुरू होणार होती जी ६ तारखेला संपणार आहे.याशिवाय बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आज आशेचा नवा किरण उगावल्याने गुंतवणूकदारांनी एकप्रकारे सुटकेचा श्वासच घेतला आहे.अर्थात शेअर बाजाराने कालच्या ४४३ लाख कोटींच्या बाजार भांडवलाने (Market Capitalisation) ने आज ४४५ कोटीवर भरारी घेतल्याने गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात २ लाख कोटींची कमाई केली आहे.
कालपासून बँकिंग क्षेत्रातील समभागांची घसरण आजही सत्राच्या अखेरीस कायम राहिली आहे.बीएसई (BSE) बँक निर्देशांकात (०.०३%)म्हणजेच १९.९१ अंशाने घसरण होत बँक निर्देशांक ६२७०१.६९ पातळीवर पोहोचला तर निफ्टी बँक निर्देशांक (Nifty Bank Index) निर्देशांकात मात्र किंचितशी सुधारणा दिसून आली आहे. निफ्टी बँक निर्देशांक (०.१४%) ५५६७६.८५ पातळीवर पोहोचला आहे.नुकत्याच आलेल्या सर्व्हनुसार सरकारी बँकांची आर्थिक परिस्थिती खाजगी बँकाहून सक्षम आढळल्याने पीएसयु बँकांच्या सुधारित परिणामांचा बाजाराला थोड्या प्रमाणात का होईना आधार मिळाला आहे.आजही शेअर बाजारातील अस्थिरता (Volatility) कायम राहिली होती. एकूणच आज बाजाराचा ट्रेंड बघता सकाळपेक्षा शेवटच्या सत्रात काही प्रमाणात बँकांचे समभाग गडगडले ज्याचा फटका बँक निर्देशांकाला बसला.
याशिवाय रशिया युक्रेन वादाचा दबाव आजतागायत आंतरराष्ट्रीय बाजारात कायम असताना गुंतवणूकदारांनी आपला रोख सोन्याच्या गुंतवणूकीकडे वळवला आहे.याची परिणती म्हणून दक्षिण आशियाई बाजारात व जगभरात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.याशिवाय आज बीएससी मिडकॅप (Midcap) व स्मॉलकॅपमध्ये (Small Cap) मध्ये अनुक्रमे ०.७६ टक्क्यांनी व ०.५८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.याव्यतिरिक्त कारऐज रिपोर्टने दिलेल्या अहवालानुसार,चौथ्या तिमाहीत पीएसयु बँकांच्या नफ्यात खाजगी बँकाहून अधिक वाढ झाली आहे. ही बाब शेअर बाजारात सुखावह ठरली आहे.
विशेषतः तीन दिवसांच्या पडझडीनंतर डॉलरच्या किंमतीत घट झाल्याने भारतीय बाजाराला यांचा फायदा झाला. चीन अमेरिका यांच्यातील व्यापार मतभेदाचा फटकाही डॉलरचे अवमूल्यन करुन गेला.आज शेअर बाजारात जवळपास क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) ०.२० ते ०.७० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने बाजारात कंसोलिडेशन (Consolidation) होण्यास मदत झाली.त्याला अपवाद ठरला तो म्हणजे रिअल्टी (Reality Share) समभाग काल वधारलेले असताना आज मात्र निराशाजनक ठरले.रिअल्टी समभागात ०.७० टक्क्याने घसरण झाली आहे. तेल व गॅस(०.६७%)व फायनांशियल मिड स्मॉल सर्विसेस समभाग (०.७९%) समभाग तेजीत राहिले.तसेच बँक,आयटी या समभागावत तेजी दिसून आली.तेल व गॅस समभाग वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे, ज्याचा प्रमुख आधार डॉलरचे अवमूल्यन बनला आहे. भारतातील रुपयाचे गेल्या तीन आठवड्यात मोठे अवमूल्यन झाले परिणामी बाजारातील परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात आपली गुंतवणूक काढून घेतली.रुपये व डॉलरचे अवमूल्यन होत असल्याने सध्याला परिस्थितीत अस्थिरता कायम आहे.
आजच्या सत्राअखेरीस बीएससी (BSE) मध्ये स्वान एनर्जी (८.९२%),इटर्नल (३.३२%),रेल विकास (६.४९%),एसआरएफ (३.०९%),पीसी फिनटेक (५.८६%),इंडसइंड बँक (१.७९%),टेक महिंद्रा (१.२५%),रिलायन्स (१.२३%) एचडीएफसी बँक (०.८१%) या समभागात वाढ झाली आहे तर स्पार्क (१९.७१%),चोला फायनांशियल (४.०३%),इंडिया सिमेंट (२.०७%),बजाज फिनसर्व्ह (१.६६%),एक्सिस बँक (०.९०%),टीसीएस (०.७२%),टायटन कंपनी (०.६०%),लार्सन (०.५८%),आयसीआयसीआय बँक (०.४८%) या समभागात घट झाली आहे.
सत्राअखेरीस एनएससी (NSE) मध्ये आयरकॉन इंटरनॅशनल (IRCON International) (१३.६७%),रेलटेल कॉर्पोरेशन (१०.०८%),स्वान एनर्जी (८.९६%), स्विगी (८.८७%),पीबी फिटनेक (५.८३%),इटर्नल (३.३६%),भारती एअरटेल (१.८५%),जियो फायनांशियल सर्विसेस (२.२७%),रिलायन्स (१.२८%),एचडीएफसी बँक (०.८६%), टेक महिंद्रा (०.८४%) समभागात वाढ झाली असून नुकसान आदित्य बिर्ला फॅशन (१०.७३%),इंडिजेन (४.७३%),चोला फायनांशियल (३.६६%),बजाज फिनसर्व्ह (१.८०%), ट्रेंट (१.४९%),श्रीराम फायनान्स (१.०९%),एक्सिस बँक (०.८९%),टीसीएस (०.७१%) या समभागावर झाले आहे.
आजच्या सत्राअखेरीस परिस्थितीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'४ जून रोजी बेंचमार्क निर्देशांकांनी जोरदार पुनरागमन केले, सकारात्मक जागतिक संकेत आणि नवीन जोखीम घेण्याची क्षमता यामुळे तीन दिवसांच्या घसरणीच्या मालिकेला ब्रेक लावला.निफ्टी सपाट पातळीवर उघडला परंतु सत्रादरम्यान हळूहळू वाढ होत गेला आणि अखेर ७७ अंकांनी किंवा ०.३२% ने वाढून २४,६२० वर स्थिरावला.गुंतवणूकदारांचे लक्ष व्यापक बाजाराकडे वळले, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप काउंटरमध्ये मजबूत कामगिरी दिसून आली. निफ्टी मिडकॅप १०० ने ०.७% वाढ केली, तर निफ्टी स्मॉलकॅप १०० ने इंट्राडे ०.८% वाढ केली, ज्यामुळे वाढलेला सहभाग आणि रोटेशनल फ्लो दिसून येतो.क्षेत्रीय आघाडीवर,मीडिया,सार्वजनिक क्षेत्रातील बँका,आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये लक्षणीय वाढ दिसून आली.तथापि,निवडक नफा बुकिंग दरम्यान रिअल्टी क्षेत्र दबावाखाली राहिले.इंडिया VIX मध्ये ४.९% ची घसरण झाल्याने अस्थिरता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.'
आजच्या निफ्टीवर प्रतिक्रिया देताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले, 'गुरुवारी साप्ताहिक समाप्ती सत्रापूर्वी स्टॉक विशिष्ट कृतींमुळे निफ्टीने मागील सत्र किंमत श्रेणीमध्ये बंदिस्त राहून एकत्रीकरणाचे संकेत दिले. खरेदीची मागणी गेल्या १६ सत्र श्रेणीच्या २४,४००-२५,०८० च्या खालच्या बँडभोवती दिसून येत आहे,आम्हाला अपेक्षा आहे की शुक्रवारी आरबीआयच्या चलनविषयक धोरणाच्या निकालापूर्वी निर्देशांक एकत्रीकरण वाढवेल.
२४,४००-२४,५०० च्या आसपासचा झोन एक महत्त्वाचा आधार क्षेत्र म्हणून काम करतो,जो मागील ब्रेकआउट झोन,अलीकडील स्विंग नीचांकी आणि मागील अपट्रेंडच्या प्रमुख फिबोनाची रिट्रेसमेंट पातळींशी जुळवून घेतो. या २४,४००- २४,५०० सपोर्ट बँडच्या खाली निर्णायक ब्रेकमुळे तीव्र घसरण होऊ शकते.वरच्या बाजूस,निर्देशांक २५,०५०-२५,०८० च्या जवळ कडक प्रतिकाराचा सामना करतो, जिथे मागील दोन साप्ताहिक उच्चांक एकत्र आले आहेत,ज्यामुळे अल्पकालीन प्रतिकार मर्यादा निर्माण झाली आहे.'
बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले,'शुक्रवारी आरबीआयच्या चलनविषयक धोरणाच्या निकालापूर्वी दोन्ही बाजूंनी एकत्रीकरण दर्शविणारी लहान सावली असलेल्या निर्देशांकाने 'डोजी कॅन्डल' तयार केली आहे.मंगळवारी सत्रात निर्देशांक गेल्या ५ आठवड्यांच्या एकत्रीकरण क्षेत्राच्या ५६,०००-५३,५०० च्या वरच्या बँडपासून कमी प्रतिक्रिया देत होता.आम्हाला वाटते की ५६,००० क्षेत्राच्या वर बंद होणे हे जवळच्या काळात ५६,७०० झोनकडे वरच्या हालचालीच्या विस्ताराचे संकेत देईल. असे करण्यात अयशस्वी होणे हे गेल्या पाच आठवड्यांच्या एकत्रीकरणाच्या विस्ताराचे संकेत देईल. तात्काळ आधार ५५,०००-५५,२०० पातळीवर ठेवल्याने अल्पकालीन रचना रचनात्मक राहते, तर प्रमुख अल्पकालीन आधार ५४,०००-५३,५०० वर दिसून येतो,जो ५०-दिवसांच्या ईएमए (EMA),प्रमुख फिबोनाची रिट्रेसमेंट पातळी आणि स्थापित पाच आठवड्यांच्या एकत्रीकरण बँडच्या खालच्या टोकाशी जुळतो.'
बाजाराची पुढील दिशा -
बाजार आरबीआयच्या वित्तीय समितीच्या निर्णयाप्रत बारकाईने पाहत आहे.तसेच जागतिक पातळीवर डॉलरची व रुपयाची हालचाल,रशिया युक्रेन यांच्या परिणामी हालचाली,चौथ्या तिमाहीतील उत्पादन क्षेत्राची कामगिरी यांचा एकत्रित परिणाम बाजारावर दिसू शकतो.उद्याच्या सत्रात क्षेत्रीय बँकिग,फायनांशियल सर्विसेस,आयटी,फार्मा समभागांची कामगिरी पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.याखेरीज परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या हालचाली पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.