Scoda Tubes IPO News: स्कोडा ट्युब्ज आयपीओला संमिश्र प्रतिसाद कंपनीचा शेअर १४० रूपयाला सूचीबद्ध

प्रतिनिधी: स्कोडा टयुब लिमिटेड (Scoda Tubes Limited) चा आयपीओ (IPO) बाजारात सूचीबद्ध (Listed) झाला आहे.२८ ते ३० मे दरम्यान हा आयपीओ बाजारात दाखल झाला होता.आता तो बीएससी (BSE)व एनएससीवर नोंदणीकृत झाला आहे.आज बाजारात सूचीबद्ध झाल्यावर कंपनीचा समभाग (Share) १४० रुपयावर नोंदणीकृत झाला होता.'ग्रे ' मार्केटमध्ये ७ टक्के म्हणजेच साधारणतः १४७ रुपये प्रति समभाग दराने विकला जात आहे. बाजारात दाखल होण्यापूर्वी कंपनीने १४० रुपये प्रति समभाग प्राईज बँड निश्चित केला होता.


या आयपीओसाठी किरकोळ गुंतवणूकदारांना (Retail Investors) साठी किमान १३००० रुपयांची गुंतवणूक करणे बंधनकारक होते. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी एकूण आयपीओतील २८.५७% वाटा निश्चित करण्यात आला होता.तर विना संस्थात्मक गुंतवणूकदार (NIB) यांच्यासाठी २१.४३ गुंतवणूक वाटा निश्चित करण्यात आला होता.तर उर्वरित ५० टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होता‌.


आज सकाळी नोंदणीकृत झाल्यावर प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आयपीओला मिश्र प्रतिसाद मिळाला आहे.या २२० कोटींच्या आयपीओला किरकोळ ग्राहकांकडून थंड प्रतिसाद मिळतानाच विना संस्थात्मक गुंतवणूकदारांचा तुलनात्मकदृष्ट्या चांगला प्रतिसाद मिळाला आहे.या गुंतवणूकदारांनी एकूण सबस्क्रिप्शनमधील ५७.३७ टक्के वाटा खरेदी केला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी केवळ २०.८९ टक्के वाटा उचलला असून विना संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १२१.७२ टक्के सबस्क्रिप्शन खरेदी केले.पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून वाट्यातीर ७२.९७ टक्के वाटा खरेदी केला गेला आहे.


Scoda Tubes Limited कंपनी २००८ साली स्थापन झाली होती.कंपनी स्टेनलेस स्टील व पाईप क्षेत्रात कार्यरत आहे. गुजरात येथील या कंपनीकडून विविध पाईप्स व ट्युब्जचे दर्जेदार उत्पादन केले जाते.


आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये चौथ्या तिमाहीत कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax) मध्ये मार्च २०२४ मधील १८.३० कोटींच्या तुलनेत वाढत २४.९१ कोटींचा नफा झाला होता.तर मार्च २०२४ मधील ४०२.४९ कोटींच्या महसूलात डिसेंबर २०२४ मध्ये घट होत महसूल ३६३.४८ कोटींवर पोहोचला होता. कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ८३८.७३ कोटी आहे.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,कंपनीकडून खेळते भांडवल (Working Capital Requirement), व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी तसेच इतर दैनंदिन खर्चासाठी करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता

फॉरेन्सिकचं ज्ञान वापरून खून लपवण्याचा प्रयत्न, पण हुशार पोलिसांनी बिंग फोडले!

नवी दिल्ली : यूपीएससीची तयारी करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाची त्याच्याच प्रेयसीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार

मुंबईच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना मोठा दिलासा, रेल्वेकडून पर्यायी पादचारी पूल झाला खुला

मुंबई : शीव रेल्वे उड्डाणपुलाचे काम आता लवकरच सुरु होणार असून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने एक

पाकिस्तान–अफगाणिस्तान तणाव पुन्हा वाढला: तालिबानकडून इस्लामाबादवर हल्ल्याची तयारी

Pakistan Afghan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा धोक्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. नुकताच