RCB vs PBKS: ना कोहली, ना हेझलवूड, कृणाल पांड्या ठरला आरसीबीचा खरा हिरो

  99

मुंबई: १८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आरसीबीच्या चाहत्यांच्या पदरी विजेतेपदाचा आनंद आला. आरसीबीने आयपीएलच्या फायनलमध्ये पंजाब किंग्सला ६ धावांनी हरवत आयपीएलचे जेतेपद मिळवले. या सामन्यात आरसीबीच्या विजयाचा स्टार ठरला कृणाल पांड्या. त्याने आपल्या ड्रीम स्पेलने संपूर्ण सामन्याचे चित्रच बदलले.


या सामन्यात बंगळुरूने पहिल्यांदा फलंदाजी करताना १९० धावा केल्या मात्र ही धावसंख्या तितकी मजबूत नव्हती. विराट कोहलीने ३५ बॉलमध्ये ४३ धावांची खेळी केली. तर फिल साल्टने १८, मयांक अग्रवालने २४, रजत पाटीदारने २६ आणि लियाम लिव्हिंगस्टोनने २५ धावा केल्या मात्र मोठी धावसंख्या करू शकले नाहीत.


पंजाबने १९१ धावांचा पाठलाग करताना चांगली सुरूवात केली आणि पावरप्लेमध्ये ५२ धावा केल्या.मात्र यानंतर आरसीबीने सामना पलटवला. शशांक सिंहने ३० बॉलवर ६१ धावांची तडाखेबंद खेळी केली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दरम्यान, शशांकने शेवटच्या षटकांतील पहिल्या फुलटॉस बॉलला हिट केले असते निकाल कदाचित पंजाबच्या बाजूने झुकला असता.



कृणाल ठरला हिरो


या सामन्यात कृणाल पांड्याने ४ षटकांत १७ धावा देत २ विकेट मिळवल्या. त्याच्या गोलंदाजीमुळे आरसीबी सामन्यात परतली. आर्य बाद झाल्यानंतर कृणालचा स्पेल सुरू झाला. कृणालला सातव्या षटकात बॉल दिला गेला. त्याने पहिल्या षटकात ३ धावाच दिल्या. त्यानंतर पुढच्या षटकांत १५ धावा निघाल्या.त्यानंतरच्या षटकात कृणालने ४ धावा दिल्या आणि प्रभसिमरनला बाद करत पंजाबला दुसरा झटका दिला. रोमारियो शेफर्डने पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरला बाद केले. त्यानंतर कृणालने तिसरी ओव्हर टाकली. यात त्याने ७ धावा दिल्या. चौथ्या ओव्हरसाठीही कृणालला आणण्यात आले. यावेळी त्याने जोश इंग्लिसला बाद करत पंजाबविरुद्ध सामन्याचे चित्रच बदलले.

Comments
Add Comment

IND vs ENG : भारताच्या गोलंदाजांचा भेदक मारा, इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर संपुष्टात

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर

IND vs ENG: ज्यो रूट आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यात मैदानातच जोरदार बाचाबाची!

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यातील आज दुसऱ्या दिवशीओव्हल क्रिकेट मैदानावर एक मोठा

केनिंग्टन ओव्हल कसोटीत भारताचा पहिला डाव 'एवढ्या' धावांत आटोपला

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये

दुखापतीमुळे ख्रिस वोक्स पाचव्या कसोटीतून बाहेर

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये

आयुष्याला थकलो होतो, आत्महत्या करावीशी वाटत होती...धनश्रीसोबत घटस्फोटावर युझवेंद्र चहलचे विधान

मुंबई: भारताचा क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या वर्षी मार्चमध्ये घटस्फोट झाला होता. आता चहलने धनश्री

प्रो कबड्डी लीग २०२५ चे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : प्रो कबड्डी लीग २०२५ हंगामाची सुरुवात २९ ऑगस्ट रोजी विशाखापट्टणम येथील राजीव गांधी इनडोअर