'या' दिवसापासून सुरू होणार संसदेचे पावसाळी अधिवेशन

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार २१ जुलै ते मंगळवार १२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत होणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली. अधिवेशनाच्या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहात देशातील विविध विषयांवर चर्चा होणार आहे. अधिवेशनातील कामकाजाची सुरुवात सोमवार २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामकाज समितीने पावसाळी अधिवेशनाच्या तारखा निश्चित केल्या आहेत.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली होती. पर्यटकांना ठार करण्यात आले होते. या घटनेनंतर काही दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर केले आणि पाकिस्तानला दणका दिला होता. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने निवडक देशांमध्ये राजकीय शिष्टमंडळे पाठवून देशाची दहशतवाद विरोधी भूमिका जाहीररित्या मांडली होती. शिष्टमंडळांमध्ये सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांतील अनेक नेते सहभागी करुन घेतले होते. या सर्वच शिष्टमंडळांनी भारताची बाजू प्रभावीरित्या जगापुढे मांडली आहे. या पार्श्वभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशन होत आहे.
Comments
Add Comment

बिहारमध्य राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या