IPL चॅम्पियन बनलेल्या RCBवर पैशांचा पाऊस, पंजाब किंग्सलाही मिळाले कोट्यावधी रूपये

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामाचा खिताब रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकला. ३ जूनला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगलेल्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सला ६ धावांनी हरवले. आरसीबी पहिल्यांदाच चॅम्पियन बनली आहे तर दुसरीकडे मात्र पंजाब किंग्सला पहिल्यावहिल्या खिताबाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.


आयपीएल २०२५ नंतर अवॉर्ड सेरेमनी झाला. यात चॅम्पियन आणि रनर अप संघांवर पैशांचा पाऊस झाला. याशिवाय स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देण्यात आले. विजेता संघ आरसीबीला २० कोटी रूपये मिळाले. तर रनर अप पंजाब किंग्सला १२.५० कोटी रूपये मिळाले.



आयपीएल टॉप ४ बक्षीसे


विजेता संघ(आरसीबी) - २० कोटी रूपये
उपविजेता संघ(पंजाब किंग्स) - १२.५० कोटी रूपये
तिसरा संघ (मुंबई इंडियन्स)- ७ कोटी रूपये
चौथ्या नंबरचा संघ(गुजरात टायटन्स) - ६.५ कोटी रूपये


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंजाब किंग्स आणि आरसीबी हे संघ आमने सामने होते. या सामन्यात आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना १९० धावा केल्या होत्या. पंजाबसमोर विजयासाठी १९१ धावांचे आव्हान होते. मात्र पंजाबला केवळ १८४ इतक्याच धावा करता आल्या. आरसीबीच्या विजयानंतर विराटच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. या खिताबासाठी त्याला तब्बल १७ वर्षे वाट पाहावी लागली होती. पहिल्या पर्वापासून विराट कोहली आरसीबी संघासोबत आहे. त्याने अनेक हंगाम या संघाचे नेतृत्वही केले. मात्र अद्याप त्याला ट्रॉफी जिंकता आली नव्हती. तब्बल १७ वर्षांनी विराटला ही संधी मिळाली.

Comments
Add Comment

लक्ष्य सेनची जपान मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा सहज पराभव नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुममातो

हार्दिक पंड्या लवकरच मैदानात; टीम इंडियात पुनरागमनाआधी खेळणार बडोद्यासाठी

मुंबई : भारतीय संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. आशिया कप 2025

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ साठी १२ संघ खेळणार

कसोटी क्रिकेट दोन भागांत विभागले जाणार नाही नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ मधील सामने सध्या

राग, निराशा अन् हतबलता वाढतेय!

इंडियन सुपर लीग सुरू करण्यासाठी फुटबॉलपटूंची विनंती नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक फुटबॉल

एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर, विराट कोहलीने बाबरला टाकले मागे

दुबई : आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले आहे. विराट ७२५

SA20 चा भारतात जलवा! 'इंडिया डे' कार्यक्रमात चाहत्यांचा तुफान उत्साह, चौथ्या सीझनसाठी लीग सज्ज

२६ डिसेंबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान रंगणार SA20 चा चौथा सीझन ग्रॅमी स्मिथ, फाफ डू प्लेसिस, मिलर यांची मुंबईत