Gold Silver Rate Today: सोने चांदी सलग तिसऱ्या दिवशी तळपले

  49

प्रतिनिधी: तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज पुन्हा एकदा सोने प्रति ग्रॅम ११ रुपयांनी वाढले आहे. 'गुड रिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार पुन्हा एकदा २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्यात ही वाढ झाल्याने प्रति तोळा सोन्याची किंमत तब्बल ९९१७० रुपयांवर पोहोचली आहे.


२२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम किंमत १० रुपयांनी वाढली असल्याने प्रति तोळा किंमत ९०९०० रुपयांवर पोहोचली आहे. १८ कॅरेट सोन्याच्या भावात ८ रुपयांनी वाढ होत प्रति तोळा ७४३७० रुपयांवर पोहोचले आहे. एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) वर सोन्याच्या निर्देशांकात ०.३२ टक्क्यांनी वाढ झाल्याने सोने ९८०४० रुपये पातळीवर पोहोचले.चांदीच्या दरात देखील घसघशीत वाढ पहायला मिळत आहे. चांदी प्रति किलो १९०० रुपयांनी वाढत १०२०० रुपयांवर पोहोचली आहे.


एमसीएक्सवर चांदीच्या निर्देशांकात ०.१५ टक्क्याने वाढ होत पातळी १०१३७० रुपयांवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) जैसे थे असून ३३७५ पातळीवर होता. सध्या सुरू असलेल्या अनिश्चिततेच्या काळात सोने स्थिर राहण्याची अपेक्षा विश्लेषकांना आहे. फेडरल रिझर्व्हच्या पुढील धोरणात्मक हालचालींबाबत संकेतांसाठी गुंतवणूकदारांनी या आठवड्यातील आर्थिक प्रकाशनांवर, विशेषतः कामगार बाजारातील डेटावर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे.

Comments
Add Comment

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

पिंपळी नदीवरील ५० वर्ष जुना पूल खचला, पूल वाहतुकीसाठी तात्काळ बंद

चिपळूण: सध्या गणेशोत्सवासाठी कोकणात आपापल्या गावी लोकं मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत. त्यामुळे या काळांत

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर

सिंधुदुर्गांतील भावी पिढीच्या भविष्यासाठी मंत्री नितेश राणे आक्रमक दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या