'शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये'

पालघर :भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात पुढील एक आठवडा सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार दिनांक ०५ ते १२ जून दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात हलका पावसाचे संकेत असताना पावसाची आकडेवारी सरासरीपेक्षा कमी असेल, त्यानंतर आणि १३ ते १९ जून नंतर सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याबरोबरच पुढील दोन आठवडे किमान तापमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील व कमाल तापमान ०५ ते १२ जून दरम्यान सरासरी पेक्षा कमी व १३ ते १९ जून दरम्यान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली.


त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यात मॉन्सूनने प्रवेश केला नाही व १३ ते १२ जूननंतर पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने त्यागोदर फळपिके भाजीपाला व इतर खरीप पिकांच्या शेतातील मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावीत व खरीप हंगामासाठी बियाणे, सेंद्रिय खते आणि रासायनिक खते उपलब्ध करून ठेवावी.
कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी अद्याप भात पेरणीची घाई करू नये. असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र कोसबाडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ
डॉ. विलास जाधव यांच्याकडून देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत, महापालिकेवर पुन्हा सत्ता

विरार :- वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या निकालात बहुजन विकास आघाडीने (बविआ) दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली