Elon Musk : "अतिशय घृणास्पद!, मी आता सहन करू शकत नाही"; ट्रम्प यांच्या निर्णयावर मस्क यांची जोरदार टीका

वॉशिंगटन : टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन निधी विधेयकावर जोरदार टीका केली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प प्रशासनाच्या 'डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी'म्हणजे खर्च कपात विभागात टेस्लाचे मालक इलॉन मस्क दाखल झाले होते. मात्र एका विधेयकावरुन केलेल्या टीकेनंतर मस्क नुकतेच ट्रम्प सरकारमधून बाहेर पडले. त्यानंतर आता इलॉन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका मोठ्या कर आणि खर्च विधेयकावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या विजयात मोठा वाटा असणारे इलॉन मस्क हे राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात जात असल्याचे पाहायला मिळत आहे.




'लाज वाटली पाहिजे'


मस्क यांनी वन बिग ब्युटीफुल बिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कायद्यावरुन जोरदार टीका केली आहे. ट्रम्प यांनी सिनेट रिपब्लिकनना हे विधेयक मंजूर करण्याचे आवाहन केल्यानंतर मस्क यांनी भाष्य केलं. मस्क म्हणाले, "मला माफ करा पण मी आता ते सहन करू शकत नाही. काँग्रेसमधील हे विधेयक प्रचंड, अपमानजनक आणि पूर्णपणे घृणास्पद आहे. ज्यांनी याला मतदान केले त्यांना लाज वाटली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही चूक केली आहे," अशी एक्स पोस्ट मस्क यांनी केली.


दुसरीकडे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी मस्क यांच्या टीकेवर प्रत्युतर देताना, "या विधेयकाबद्दल ते काय विचार करतात हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आधीच माहित होते, पण मस्क यांच्या या निर्यणामुळे त्यांचे (ट्रम्प) मत बदलणार नाही. हे एक मोठे विधेयक आहे आणि राष्ट्राध्यक्ष त्याच्या बाजूने उभे आहेत," असं म्हटलं.डोनाल्ड ट्रम्प यांनी नियुक्ती केल्यानंतर मस्क खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सीमधून प्रयत्न करत होते.



मस्क यांनी अनेक संघीय यंत्रणांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तरी त्यांना अपेक्षित असलेली मोठी बचत झाली नाही. त्यानंतर डॉजमध्ये विशेष सरकारी कर्मचारी म्हणून त्यांची औपचारिक भूमिका गेल्या आठवड्यात संपली. अवघ्या चार महिन्यांत सरकारमधून इलॉन मस्क बाहेर पडले. ट्रम्प यांच्या अर्थसंकल्पाबद्दल निराशा व्यक्त करत मस्क सरकारमधून बाहेर पडले होते. अर्थसंकल्पामध्ये मल्टी ट्रिलियन डॉलरच्या कर सवलती आणि संरक्षण खर्च वाढवण्याचे प्रस्ताव होते. त्यानंतर आता मस्क यांनी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या अर्थसंकल्पीय विधेयकावर हल्लाबोल केला आहे.

Comments
Add Comment

चीनची मोठी झेप! ऑनर आणणार जगातील पहिला AI Robot Phone, जाणून घ्या खास फीचर्स

बीजिंग – तंत्रज्ञानाच्या विश्वात मोठा बदल घडवणारी बातमी चीनमधून समोर आली आहे. चीनची प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स

जागतिक नेमबाजी स्पर्धेत सम्राट राणाला सुवर्णपदक

कैरो : कर्नालचा युवा नेमबाज सम्राट राणा याने जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. सोमवारी,

Blast in Pakistan : इस्लामाबादमध्ये भीषण स्फोट! हायकोर्टाजवळ कार ब्लास्ट, आत्मघातकी कार स्फोटात अनेकांचे बळी

इस्लामाबाद : भारताची राजधानी दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटानंतर आता पाकिस्तानच्या राजधानीतही (Islamabad) आत्मघातकी

मोदींचा भूतान दौरा, द्विपक्षीय संबंधांना मिळणार नवी चालना

भूतान : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध

इस्लामाबादमध्ये स्फोट! अपघात की घातपात?

इस्लामाबाद: इस्लामाबाद न्यायालयाबाहेर आज दुपारी १२:३० च्या सुमारास एक मोठा स्फोट झाला. ज्यात सहा जणांचा मृत्यू

दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्तानला धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक

इस्लामाबाद : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटाने देशभरात खळबळ माजली आहे.