सातारा हादरले : अठरा वर्षांच्या शुभमचा मैदानात मृत्यू, क्रिकेट खेळता खेळता घेतला अखेरचा श्वास!

  61

पाटण, सातारा  : एकीकडे वडील अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेले... आणि दुसरीकडे, घराचा आधार असलेल्या अठरा वर्षांच्या शुभम सुरेश कदम याने क्रिकेटच्या मैदानावरच आयुष्याला रामराम ठोकला. देशपांडेवाडी (किसरुळे) या गावात घडलेली ही घटना सातारा जिल्ह्याला हादरवून गेली आहे.


नेहमीप्रमाणे शुभम संध्याकाळच्या वेळी मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. खेळताना अचानक त्याला थकवा जाणवू लागला. तो मैदानातच खाली बसला, पण काही क्षणातच अस्वस्थ होत खाली कोसळला. उपस्थित मित्रांनी आणि ग्रामस्थांनी वेळीच प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्याला तात्काळ हेळवाक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र, तिथेही काही फरक पडला नाही. नंतर कऱ्हाड येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान शुभमने अखेरचा श्वास घेतला.



शुभम पाटण येथील शासकीय तंत्रनिकेतन इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत होता. खेळकर, मनमिळावू स्वभावाचा शुभम मित्रांमध्ये लोकप्रिय होता. पण नियतीने त्याच्या तरुण वयातच खेळ संपवला. त्याचा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे.


घरात वडील अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेले, आई, आजी आणि लहान बहीण… आणि घरचा एकुलता एक मुलगा शुभम, जो आता केवळ आठवणींमध्ये उरला. कदम कुटुंबावर काळाचा घाला कोसळला असून, अंत्यसंस्कारावेळी गावकऱ्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले होते.

Comments
Add Comment

राज ठाकरे लागले कामाला, पक्षात मोठे फेरबदल, ९ जूनला ठाकरेंचा दौरा

पुणे :  पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुण्यात

काजव्यांच्या चकाकण्याचा करिष्मा बघण्यासाठी अभयारण्यात गर्दी

अकोले : काजव्यांची मायानगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भंडारदर्‍याच्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात

विद्यापीठांच्या निधी प्रस्तावांना मंजुरी नाही : कृषिमंत्र्यांची तंबी

राहुरी : राज्यातील कृषी विद्यापीठांनी निधी मागणीचे प्रस्ताव सादर करताना आधी गरज स्पष्ट करावी. बांधकाम किंवा

चकमकीत नक्षली नेता सिंहाचलमचा मृत्यू

महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, आंध्र प्रदेशात गंभीर गुन्हे गडचिरोली : छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल

Ashadhi Wari 2025 Special Bus : पंढपूर विशेष बससेवा; आषाढी वारीसाठी स्वारगेट एसटी आगाराकडून नियोजन

पुणे : आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन

पुण्यात चाललंय काय ? पतीची आत्महत्या, पत्नीला अटक

पुणे : काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणात