RCB च्या सेलिब्रेशनदरम्यान मोठी दुर्घटना! चेंगराचेंगरीत ११ जणांची मृत्यू झाल्याची भीती, तर अनेकजण जखमी

चिन्नास्वामी स्टेडियम परिसरात भीषण चेंगराचेंगरी, २५ जणांची प्रकृती गंभीर


बंगळुरू: मंगळवारी रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजेतेपद पटकावत, गेल्या १८ वर्षापासूनचे आयपीएल ट्रॉफी मिळवण्याचे  स्वप्न पूर्ण केले.  केवळ आरसीबी संघालाच नाही तर त्यांच्या चाहत्यांसाठी देखील हा विजय खूप मोठा आणि भावनाशील ठरला, पण जेव्हा याचा आनंद साजरा करण्याची वेळ आली तेव्हा चेंगराचेंगरीसारखा दुर्दैवी प्रकार बंगळुरूच्या रस्त्यावर घडला.  ज्यामध्ये ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी झाले.


रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलची ट्रॉफी पटकावत, आरसीबी चाहत्यांची १८ वर्षाची प्रतीक्षा अखेर संपवली. विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावा केल्या आणि आरसीबीला १९० धावांचा डोंगर उभारून दिला. त्यानंतर जोश हेझलवूड आणि कृणाल पंड्याने पंजाबचा पाठलाग थांबवला. अखेर बेंगळुरूने पहिल्यांदाच आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. त्यामुळे हा विजय प्रत्येकांसाठी मोठा होता. त्यामुळे या विजयाच्या निमित्ताने बंगळुरू शहरात विजय परेड आणि विशेष उत्सव आयोजित केले गेले असता, खेळाडूंना आणि आयपीएलची ट्रॉफी पाहायला आलेल्या लोकांचा उत्साह इतका नियंत्रणाबाहेर गेला की, त्यांना आटोक्यात आणणे स्थानिक पोलिसांच्या क्षमतेबाहेर गेले. ज्याचे स्वरूप भीषण चेंगराचेंगरी आणि किंकाळ्याने घेतली.



एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर ६ ते ७ लाख चाहत्यांची गर्दी


४ जून रोजी आयपीएल २०२५ चॅम्पियनशिपमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर लाखो चाहते जमले होते. दरम्यान स्टेडियमच्या गेट क्रमांक ३ वर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. ज्यामध्ये अनेक चाहते जखमी झाले. जखमी झालेल्यांना बेंगळुरूमधील बोरिंग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दरम्यान ११ जणांचा मृत्यू तर २५ हून अधिक जणांची प्रकृती गंभीर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 





लाठीचार्ज नंतर चेंगराचेंगरी


बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना चेंगराचेंरी झाली. यावेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी आरसीबीच्या चाहत्यांवर सौम्य लाठीचार्ज देखील केला. मिळालेल्या माहितीनुसार चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेट क्रमांक 3 जवळ चेंगराचेंगरी सारखी स्थिती निर्माण झाली होती. दुसऱ्या एका घटनेत, आरसीबीच्या चाहत्यानं स्टेडियममध्ये उडी मारण्यासाठी गेटवरून चढण्याचा प्रयत्न केला. यावेळी अचानक पाय घसरून तो जमिनीवर पडला. यावेळी त्याचा पाय मोडला.


विजय परेड रद्द


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा आयपीएल ट्रॉफी विजयानिमित्त समारंभ होत असल्यानं पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता. मात्र, चाहत्यांना नियंत्रित करण्यास पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या. अतिउत्साही लोकांनी कार्यक्रम पाहण्याकरिता थेट झाडावर चढण्यास सुरुवात केली. कर्नाटक सरकारनं सुरक्षेच्या कारणास्तव विधानसभा ते चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमपर्यंतची विजय परेड रद्द केली होती.

बहुप्रतिक्षित ट्रॉफीसह आरसीबी खेळाडूंची झलक पाहण्यासाठी उसळला समुदाय


चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंतच्या ओपन-बस विजय परेडचा भाग म्हणून, बहुप्रतिक्षित ट्रॉफीसह त्यांच्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी, चाहत्यांचा लोंढा सायंकाळपासूनच स्टेडियमवर जमू लागला होता. यामुळे स्टेडियममधील आणि आजूबाजूचे रस्ते कोंडीत सापडले होते आणि सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट (सीबीडी) परिसरात वाहनांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करण्यात वाहतूक पोलिसांना अडचण येत होती.  कारण रस्त्यावरून, नम्मा मेट्रोने आणि पायी जाणाऱ्या लोकांची मोठी गर्दी झाली होती. 


आरसीबीची टीम चिन्नास्वामी मैदानावर दाखल होण्यापूर्वी कर्नाटकच्या विधानसौदामध्ये मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी टीमचा सत्कार केला होता.


Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या