IPL 2025 Final : पंजाब किंग्स की आरसीबी कोण मारणार बाजी?

कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्सनं दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पाच वेळा विजेता ठरलेल्या मुंबई इंडियन्सला ५ विकेटनी हरवत ११ वर्षांनी आयपीएलची फायनल गाठलीये. पंजाब किंग्सच्या संघानं २०१४मध्ये फायनल गाठली होती. मात्र त्यावेळेस त्यांना पराभव सहन करावा लागला होता. दुसरीकडे गेल्या १८ वर्षांपासून खिताब न जिंकू शकलेला आरसीबीचा संघ आहे. त्यांनाही हा खिताब काहीही करून जिंकायचा आहे. त्यामुळे यंदाची आयपीएलची फायनल रोमहर्षक होईल हे नक्की...



आयपीएल २०२५ फायनलचा विजेता कोण असेल याची उत्सुकता आज अखेरीस संपणार आहे. आयपीएलच्या फायनलमध्ये पंजाब किंग्स आणि आरसीबी हे दोन संघ आमनेसामने आहेत. हा महत्त्वाचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगतोय. यावेळेस आयपीएलला नवा चॅम्पियन मिळणार आहे कारण पंजाब किंग्स आणि आरसीबी दोन्हीही संघांना पहिल्या वहिल्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. आरसीबीने आतापर्यंत १० वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय मात्र अद्याप त्यांना विजेतेपद मिळवता आलं नाही. ही चौथी वेळ आहे जेव्हा आरसीबीचा संघ आयपीएलची फायनल खेळणार आहे. याआधी २००९, २०११ आणि २०१६मध्ये अनुक्रमे डेक्कन चार्जेस, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या हातून पराभवाचा सामना करावा लागला होता.


विराट कोहली आयपीएलच्या सुरूवातीपासूनच आरसीबीशी जोडलेला आहे. त्यामुळे त्यालाही पहिल्या ट्रॉफीची प्रतीक्षा आहे. आरसीबीने २९ मेला खेळवलेल्या पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्सला ८ विकेटनं हरवत फायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं होतं. दुसरीकडे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाब किंग्स संघाने तब्बल एका दशकानंतर फायनलमध्ये पोहोचत आपणही काही कमी नसल्याचं दाखवलंय. यंदा आम्हीही विजेतेपदाचे दावेदार असल्याचं त्यांनी सिद्ध केलंय. श्रेयस अय्यरने कर्णधाराला साजेशी खेळी करताना दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबईला हरवत फायनल गाठली.



श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाचं यावेळी विशेष कौतुक करावंस वाटतं. कारण श्रेयस अय्यरनं पाच वर्षांत आपल्या नेतृत्वात वेगवेगळ्या फ्रेंचायझींना आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचवलंय. त्यानं २०२०मध्ये दिल्ली कॅपिटल्सला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. २०२४मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला आपल्या नेतृत्वात विजेतेपद मिळवून दिलं आणि आता पंजाब किंग्सला फायनलमध्ये पोहोचवलंय. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे. याच मैदानावर दुसरा क्वालिफायर सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात रंगला होता. यावेळेस पावसाचा खेळही पाहायला मिळाला होता. त्यामुळे आयपीएलच्या आज रंगणाऱ्या फायनलमध्ये पावसाची भूमिका काय असेल हे ही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंजाब किंग्स बाजी मारणार की रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार हे आजच्या सामन्याच्या निकालातून दिसेलंच.

Comments
Add Comment

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई : अयोध्येचा राजा, माणूस, कुंकू, झनक झनक पायल बाजे, डॉ. कोटनीस की अमर कहानी, दो आँखे बारा हाथ, नवरंग, पिंजरा’

डोंबिवलीतील अनमोल म्हात्रे, महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई : डोंबिवलीतील राजकीय घडामोडींमध्ये मोठा बदल झाला आहे. माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल

बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला भीषण आग !

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ आणि इतर रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या मनावर घर करणाऱ्या अभिनेता शिव ठाकरेच्या मुंबईतील

सिडबी वेंचर कॅपिटल अंतरिक्ष वेंचर कॅपिटल फंडात १००० कोटी गुंतवणूक करणार

मोहित सोमण: स्पेस टेक टेक्नॉलॉजीत सातत्याने भारतात प्रगती होत आहे. मोठ्या प्रमाणात अंतराळ संशोधन अथवा

रहस्य, अ‍ॅक्शन आणि भावनांचा संगम, ‘आफ्टर ओ.एल.सी’चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई: दुनियेच्या आड दडलेलं एक गूढ लवकरच उलगडणार, अशी भावना ‘आफ्टर ओ.एल.सी’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहून वाटू लागले