वसाका अतिथी गृहातील सामानांची चोरी

सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर; कार्यस्थळ मोजतेय शेवटच्या घटका


देवळा :संपूर्ण कसमादेसह उत्तर महाराष्ट्राचे वैभव असलेला वसंतदादा पाटील कारखाना (वसाका) सध्या शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र असून, वसाका कार्यस्थळ आवाराची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. दोन वर्षांपासून बंद असलेल्या या कारखान्यात सामान चोरीचेही प्रकार घडत आहेत.


१५ वर्षापूर्वीपर्यंत या कारखान्याच्या माध्यमातून हजारो शेतकरी, कामगार, वाहतूक ठेकेदार यांचा उदरनिर्वाह होत होता. दीड दोन वर्षांपूर्वी कारखान्यासह विज प्रकल्पाच्या महाकाय ट्रान्सॅफार्मरमधून हजारो लिटर ऑइलची चोरी करून गुन्हेगार पसार झाले. चोरीचे धागेदोरे कळवणपर्यंत गेले होते. तरी पोलिसांना चोरांना पकडण्यात यश आले नाही. मधल्या काळात मुख्य कारखान्याच्या आत प्रवेश करून पश्चिम बाजूला असलेल्या दगडी भिंतींना भलेमोठे भगदाड पाडत लाखो रुपये किंमतीच्या इलेक्ट्रिक मोटारी, पितळी तसेच लोखंडी व्हॉल्वसह ट्रॅक्टर ट्रॉलीत भरून गिरणा नदीकिनारी नेलेले सापडले होते. कोट्यावधी रुपयांचे मूल्य असलेले किंमती सामान कारखान्यात होते; परंतु दुर्दैवाने दोन वर्षांनंतर तेथे काय शिल्लक राहिले हे सांगणे कठीण आहे. नाही म्हणायला तेथे सध्या दोन तीन नर-मादी बिबट्यांचा मुक्त संचार होता. त्यामुळे काहीकाळ चोऱ्या आटोक्यात आल्या होत्या.



अगदी अलीकडेच कारखान्याच्या उत्तर बाजूस असलेल्या वातानुकुलित अतिथीगृहाच्या पाठीमागे असलेल्या शेतकरी निवासातील खोल्यांची कुलपे तोडून तेथील किमती फर्निचर, गाद्या व इतर सामान लुटून नेले असल्याचे उघडकीस आले आहे. कारखान्याच्या रोजंदारीवर कामावर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विठेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी कुबेर जाधव यांच्या कानावर ही बाब टाकली असता त्यांनी कार्यस्थळावर पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचाऱी विशाल निकम, दिनेश ठाकरे, युनियन सदस्य शशिकांत पवार, दीपक पवार, रणधीर पगार उपस्थित होते.


५०० कोटींची मालमत्ता असलेल्या वसाकाची सुरक्षा वाऱ्यावर सोडून प्रस्थापितांनी पळ काढला. २५००० सभासद, शेकडो कामगारांची रोजी रोटी बुडाली. कारखान्याच्या चहुबाजूंनी चोरांचा सुळसुळाट झाला असून कारखान्याला कोणी वाली नाही. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.
- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Comments
Add Comment

Minister Girish Mahajan : महाराष्ट्रातील ८० हून अधिक पर्यटक नेपाळमध्ये अडकले, चौघांशी संपर्क - मंत्री गिरीश महाजन

Minister Girish Mahajan : नेपाळमध्ये आलेल्या महापुरात (Flood Flash) अडकलेल्या राज्यातील पर्यटकांच्या (Tourist) शोधासाठी राज्य शासन केंद्र

Nashik : पत्नी अन् वडिलांना 'तो' शेवटचा मेसेज केला अन् तरुणानं आयुष्य संपवलं , नेमकं काय घडलं ?

Nashik Crime News : नाशिकच्या पंचवटी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 32 वर्षीय तरुणाने पत्नी आणि वडिलांना मोबाईलवर

Nashik News : खळबळजनक ! गोदापात्रात बुडून ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Nashik News : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या पंचवटी येथील गोदापार्क परिसरातील (Goda Park Area) जॉगिंग

Nashik Crime News : सुरगाणा हादरला ! वृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने हत्या

Nashik Crime News : सुरगाणा तालुक्यातील केळुणे गावात वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक

'Kumbh Bhakti Sangam' : नाशिकमध्ये शुक्रवारपासून कुंभ भक्ती संगम, मुख्यमंत्री करणार उद्घाटन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली

Nashik : मालेगावमध्ये वाद चिघळणार ? टिपू सुलतानच्या प्रतिमेवरून वादाची ठिणगी ; भाजपचा कडक इशारा

Nashik : सहा महिन्यांपूर्वी मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपू सुलतानचे छायाचित्र लावण्यात आले