आयपीएल पर्व १८ चा नवीन चेहरा ?

मुंबई (सुशील परब) : आज आपण सर्वजण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी इथे जमलो आहोत. आज, ३ जून २०२५ रोजी, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२५ या अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) आणि पंजाब किग्स (PBKS) यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना केवळ एक क्रिकेटचा मुकाबला नाही, तर तो दोन संघांच्या स्वप्नांची, त्यांच्या मेहनतीची आणि त्यांच्या चाहत्यांच्या अपेक्षांची लढाई आहे. कारण या दोन्ही संघांनी आजवर एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकलेली नाही। त्यामुळे आज एक नवा विजेता आयपीएलच्या इतिहासात आपले नाव कोरणार आहे.


रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु थोडा मजबूत वाटतो त्यांचा फॉर्म चांगला वाटतो. विराट कोहली चांगलाच फॉर्मात आहे. प्रत्येक सामन्यात थावा करत आहे. फिल सॉल्ट, रजत पाटीदार, लिविंगस्टोन, जितेश शर्मा, रोमारीयो शेफर्ड, कृणाल पांड्या असे फलंदाज आहेत. त्याची फलंदाजी चांगली होत आहे. भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड, कृनाल पांड्या, सुयश शर्मा, रोमारीयो शेफर्ड असे गोलंदाज आहेत. मागील सामन्यात गोलंदाजीच्या जोरावर त्यानी पंजाब किग्समा सहज पराभव केला.


पंजाब किग्सला फक्त १०१ धावा करता आल्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे पारडे जड वाटते. पंजाब किंग्सने उपांत्य फेरीत मुंबई इंडियन्सला धूळ चारली, त्यामुळे पंजाब किग्सचा आत्मविश्वास वाढला आहे. श्रेयश अय्यरने कर्णधारास साजेशी खेळी केली. त्याने ४१ चेंडूत ८७ धावांची नावाद खेळी केली, त्यामुळे मुंबई इंडियन्सवर सहज विजय मिळवला व मुंबई इंडियन्सला अंतिम फेरीपासून रोखले. प्रियाश आर्य, प्रभसिमरन सिंग, ज्योस इंग्लीस, नेहल वधेरा, शशांक सिग, मार्क स्टॉयनिस अशी मजबूत फलंदाजी त्यांच्याकडे आहे. अर्शदीपसिंग, मार्क स्टॉयनिस, युजवेंद्र चहल, जेमिन्सन, ओमरझाई, व्याशक, असे गोलंदाज आहेत. त्यामुळे ही लढत रंगतदार होईल.


पंजाब किग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने तीन वेगवेगळ्या संधाना आयपीएल फायनलमध्ये पोहोचवले आहे, त्यामुळे त्याचे नेतृत्व महत्वाचे ठरेल. हवामानाबद्दल बोलायचे झाले तर दुपारच्या सुमारास हलक्या पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र संध्याकाळपर्यंत हवामान स्वच्छ होण्याची अपेक्षा आहे, वधूया महाअंतिम सामन्यात विजय कोणाच्या गळ्यात माळ घालेल. दोघांपैकी कोणता संघ प्रथमच आयपीएल २०२५ चा विजेता ठरेल. आजचा दिवस क्रिकेट पाहत्यांसाठी अविस्मरणीय दिवस ठरणार आहे. दोन्ही संघाना प्रहार परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा। प्रहार आयपीएल स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकाचे प्रहार परिवारातर्फे हार्दिक आभार.....


चला आपण सर्व या रोमांचक सामन्याचा आनंद घेवूयात....

Comments
Add Comment

जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ईशान आणेकरचे घवघवीत यश

जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई ठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या

बॅडमिंटनमध्ये २५ सेकंदांची ‘टाईम-क्लॉक’ प्रणाली लागू

नवी दिल्ली : बॅडमिंटन सामन्यांना अधिक वेग देण्यासाठी, खेळाची जागतिक नियामक संस्था ‘बीडब्ल्यूएफ’ने (बॅडमिंटन

BCCI : सचिन तेंडुलकर बीसीसीआयचा अध्यक्ष होणार? क्रिकेटच्या देवानेच दिले खरे उत्तर

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना

Wrestler : भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियावर कोसळला दुखा:चा डोंगर

सोनीपत: भारताचा ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला

Asia Cup 2025: यूएईवर विजय मिळाल्यानंतर या भारतीय क्रिकेटरला मिळाला खास अवॉर्ड

दुबई: आशिया कप २०२५ (Asia Cup 2025) मध्ये भारतीय क्रिकेट संघाने विजयी सलामी दिली आहे. युएई (UAE) विरुद्धच्या पहिल्या सामन्यात

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगला तेलंगणा सरकारने जाहीर केला पाठिंबा

पुणे : जगातील पहिली फ्रँचायझी-आधारित सुपरक्रॉस रेसिंग लीग म्हणून ओळखली जाणारी इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगने