शिवाजी पार्क परिसराची स्वच्छता यांत्रिक झाडूद्वारेच

  67

पारंपरिक पद्धतीने हाती झाडू मारणे महापालिकेने केले बंद


मुंबई :दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या (शिवाजी पार्क) परिसरातील कचरा हा पारंपरिक पद्धतीने हाती झाडू मारुन केला जातो. त्यामुळे सकाळ, संध्याकाळ फिरण्यास येणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहक करावा लागतो. त्यामुळे रस्त्यावरील कचरा आता पारंपारिक झाडूद्वारे साफ करण्याऐवजी यांत्रिक झाडूद्वारे करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार प्रशासनाने अखेर या कार्यपद्धतीत सुधारणा करत शिवाजीपार्कच्या आसपासच्या चालण्याच्या जागांची सफाई यांत्रिक झाडूने करण्यास सुरुवात केली आहे.

दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क मैदानाच्या बाजुला असलेल्या कठड्यांच्या दोन्ही बाजुला नागरिकांची गर्दी असते. या भागाची स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेच्यावतीने दोन सत्रांमध्ये स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या दोन्ही सत्रांमध्ये साफ करण्यासाठी झाडू मारली जाते. ज्याठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, तसेच त्यांचा वावर असतो, त्यामुळे साफसफाई करताना यामुळे धुळीचा त्रास त्यांना होवू नये याची काळजी घेणे आवश्यक असते. परंतु तशी काळजी घेतली जात नाही. मात्र, या मैदानाला जोडून असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील साफसफाई करण्यासाठी मिनी यांत्रिक झाडूचा वापर केला जातो. शहराचे माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी यांत्रिक झाडूच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून यांत्रिक झाडू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि या झाडूचा वापर स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाच्या सफाईसाठी केली जात आहे. या यांत्रिक झाडूचा वापर सावरकर मार्गा ऐवजी मैदान परिसरातील स्वच्छता ही यांत्रिक झाडूने केल्यास चांगल्याप्रकारे सफाई होवू शकते तसेच यामुळे उडणाऱ्या धुळीचाही त्रासही होणार नाही.


महापालिका प्रशासनाने पारंपारिक पद्धतीने मैदानाच्या सभोवतालच्या परिसराची सफाई यांत्रिक झाडूने करावी अशाप्रकारची मागणीच रहिवाशांकडून केली जात आहे. याची प्रशासनाने तातडीने दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या परिसरातील चालण्याच्या जागेवर यांत्रिक झाडूद्वारे सफाई करण्याची चाचणी सुरु असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता या परिसराची सफाई यांत्रिक झाडूद्वारे करण्यात येते. त्यामुळे या यांत्रिक झाडूद्वारे होणाऱ्या सफाईमुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्यामुळे शिवाजीपार्क मधील नागरिकांना दिलासा मिळत आहे.

Comments
Add Comment

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी , मुंबई ते मडगाव प्रवास होणार अधिक सोयीस्कर !

मुंबई : मुंबई ते मडगाव दरम्यान आतापर्यंत आठ डब्यांची ‘वंदे भारत’ चालवण्यात येत होती. मात्र, गणेश चतुर्थीच्या

अमित ठाकरे आणि आशिष शेलारांच्या भेटीत काय झाले ?

मुंबई : मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. मनसे प्रमुख राज ठाकरे

Maharashtra Police : पदोन्नतीचे आदेश २४ तासांत रद्द, ३६४ पोलीस निरीक्षकांना मूळ पदावर परत पाठवण्याचे आदेश, मॅटने दिला दणका

मुंबई : पदोन्नतीतील आरक्षणाला कायदेशीर मान्यता नसल्याचे निकाल मुंबई उच्च न्यायालयाने तसेच महाराष्ट्र

गणपती बाप्पांचा खड्ड्यांनी भरलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास

कोकणात गणेशमूर्ती घेऊन जाणारे भाविक करतात तारेवरची कसरत मुंबई : गणेशोत्सवाची चाहूल लागली की, कोकणातल्या

'गणेशोत्सवात किती पडणार पाऊस ? पावसाविषयी हवामान खात्याचा नवा अंदाज जाहीर

मुंबई : गणेशोत्सवात किती पाऊस पडणार ? या अनेकांना सतावत असलेल्या प्रश्नाचे उत्तर हवामान खात्याने दिले आहे.

'चाकरमानी' नाही 'कोकणवासी' म्हणा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला आदेश

मुंबई : कोकणातून मुंबईसह अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांना यापुढे 'चाकरमानी' असे म्हणायचे नाही तर