पंतप्रधान मोदी १ ऑगस्टला सोलापूर दौऱ्यावर

  50

सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात खेलो इंडिया आणि विद्यापीठ विकास फंडातून २० कोटी रुपयांचे इनडोअर स्टेडिअम उभारले जात आहे. देशातील तिसरे आणि महाराष्ट्रातील पहिले सर्वात मोठे ते स्टेडिअम असणार आहे. ४० बाय ६० मीटर अशा आकाराच्या या स्टेडिअममध्ये १५ पेक्षा जास्त खेळ खेळले जाऊ शकतात.


सोलापूर जिल्ह्यात कुस्ती, बॅडमिंटन, बास्केट बॉल, हॉलीबॉल, टेनिस बॉल, खोखो, कबड्डी, फेन्सिंग, योगा, कराटे, रेसलिंग, ज्युडो, तायक्वांदो, चेस, हॅण्डबॉल असे खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील इनडोअर स्टेडिअममध्ये आंतरमहाविद्यालयीन, विद्यापीठस्तर, विभागीय, राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होतील.


१५ जुलैपर्यंत काम पूर्ण होईल, असे सध्याचे नियोजन असून त्यादृष्टीने स्टेडिअमचे काम सुरू आहे.१ ऑगस्ट रोजी विद्यापीठाचा वर्धापन दिन असून त्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक, विद्यापीठाची प्रशासकीय इमारत व या इनडोअर स्टेडिअमचा लोकार्पण सोहळा घेण्याचे नियोजित आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पणाचा सोहळा पार पडेल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय मंजूर

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.