उत्तरप्रदेश : युपीच्या पाकिस्तानी निर्वासितांना मिळणार जमिनीचे हक्क

राज्य सरकारने स्थापन केलेल्या अंजनेय समितीचा अहवाल


लखनऊ : देशाच्या फाळणीनंतर उत्तरप्रदेशात स्थायिक झालेल्या पाकिस्तानी निर्वासितांना उत्तराखंडच्या धर्तीवर जमिनीचे हक्क दिले जाणार आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या आंजनेय समितीने याबाबत अहवाल दिला आहे. राज्यात सध्या ५० हजार एकर जागेवर २० हजार निर्वासित कुटुंबांचे वास्तव्य असून ते हक्काच्या जमिनीपासून वंचित होते.



अनेक निर्वासित होते जमीन मालकीच्‍या हक्‍कापासून वंचित


देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानातून आलेले निर्वासित उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरी, रामपूर, बिजनौर आणि पिलीभीत येथे स्‍थायिक झाले होते. बहुतांश निर्वासित हे हिंदू आणि शीख होते. काही वर्षांनंतर सरकारने त्‍यांना उपजीविेकसाठी जमीन दिली. मात्र जमीन सरकारच्या नावावर होती. त्‍यामुळे अनेक कटुंब ही हस्‍तांतरणीय जमीन मालिकीच्‍या हक्‍कापासून वंचित राहिले होते.


रामपूरमधील २३ गावांमध्ये आणि बिजनौरमधील १८ गावांमध्ये निर्वासितांना स्थायिक केले आहे. तसेच काही जण लखीमपूर खेरी आणि पिलीभीतमधील वेगवेगळ्या गावांमध्ये किंवा जंगलाच्या काठावर स्थायिक झाले होते. या कुटुंबांच्या वारसांना त्यांच्या जमिनीवर बँकेकडून पीक कर्जाव्यतिरिक्त कोणतेही कर्ज घेता येत नाही. त्यांना जमीन विकण्याचा अधिकार देखील नाही. या संपूर्ण प्रकरणाच्‍या चौकशी व उपाययोजना सुचविण्‍यासाठी अंजनेय समिती स्‍थापन करण्‍यात आली. या समितीने आपला अहवाल राज्‍य सरकारला सादर केला आहे. अहवालानुसार काही निर्वासित कुटुंबांना सरकारी अनुदान कायद्याअंतर्गत जमीन देण्यात आली होती. त्यांना ग्रामसभा आणि विविध विभागांच्या मालकीच्या जमिनीवर देखील स्थायिक करण्यात आले होते. सध्या, सरकारी अनुदान कायदा संपला आहे. निर्वासितांच्या पूर्ण मालकीसाठी कायदा करणे आवश्यक आहे.



अंजनेय समितीने आपल्‍या अहवालात म्‍हटले आहे की, "निर्वासित कुटुंबांना दिलेल्या जमिनीवर पूर्ण मालकी म्हणजेच हस्तांतरणीय जमीनधारक हक्क देण्यासाठी स्वतंत्र कायदा आवश्यक असेल. या प्रकरणांमध्ये विद्यमान नियम शिथिल करता येतील. उत्तराखंडच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जमिनीच्या किमतीच्या काही टक्के रक्कम घेऊन मालकी देण्याचे काम करण्यात आले आहे. उत्तराखंडप्रमाणे उत्तर प्रदेशमध्‍यही काही किंमत घेऊन किंवा मोफत हस्तांतरणीय जमीनधारक हक्क देता येतात. यासाठी कायद्यात बदल करून त्यांना इतरत्र जमीन देण्यासाठी किंवा त्याच जमिनीवर मालकी हक्क देण्यासाठी विचार करावा लागेल. वनजमिनीवर हक्क देण्यासाठी केंद्र सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयाची परवानगी देखील घ्यावी लागेल. नियमांनुसार ग्रामसभेची जमीन त्याच गावातील मूळ रहिवाशांना देता येते. त्याचप्रमाणे, संबंधित विभागांनाही विभागांची जमीन देण्याचा अधिकार आहे.

Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी