मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक परिपक्वतेचं, किंवा लग्नासाठी तयार असल्याचं लक्षण मानली जाते. ७१ टक्के मुलींना पहिल्यांदा पाळी आली तेव्हाच तिची माहिती मिळते, या मोहिमेतून टाटा ट्रस्ट्स मासिक पाळी ही आरोग्याचं लक्षण आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. ही मोहिम झारखंड, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील ग्रामीण भागात सखोल सांस्कृतिक व सामाजिक अभ्यासावर आधारित आहे. यातून समोर आले की, अनेक स्त्रिया व तरुण मुली स्वच्छता, खाजगीपणा आणि मासिक पाळीच्या व्यवस्थापनात अडचणीत आहेत. कारण समाजात पाळी म्हणजे मुलगी ‘लग्नासाठी तयार’ असं मानलं जातं. आंगणवाडी सेविकाही हीच भीती व्यक्त करतात. पुरुषांमध्ये पाळीबाबत माहिती कमी असली तरी, जेव्हा योग्य माहिती दिली जाते, तेव्हा ते पॅड आणणे किंवा डॉक्टरकडे नेणे यासारख्या कृतींमध्ये मदतीस तयार असतात.


बहुतेक आई मुलींशी पाळीबाबत संवाद करत नाहीत, कारण समाजात पाळी म्हणजे मुलगी ‘लग्नासाठी तयार’ असं मानलं जातं. आंगणवाडी सेविकाही हीच भीती व्यक्त करतात. पुरुषांमध्ये पाळीबाबत माहिती कमी असली तरी, जेव्हा योग्य माहिती दिली जाते, तेव्हा ते पॅड आणणे किंवा डॉक्टरकडे नेणे यासारख्या कृतींमध्ये मदतीस तयार असतात.



ही मोहिम ‘सोशल अ‍ॅन्ड बिहेविअरल चेंज कम्युनिकेशन’ (SBCC) च्या माध्यमातून सात राज्यांमध्ये राबवली जात आहे. या मोहिमेचा उद्देश आहे की, मुलींनी पहिल्यांदा पाळी आली तरीही त्या अजूनही बालपणातच आहेत, हे त्यांना जाणवावं आणि स्त्रियांनीही पाळीबाबत माहितीपूर्ण, आत्मविश्वासपूर्ण आणि लज्जारहित अनुभव घ्यावा.


दिव्यांग वाघेला, प्रमुख – वॉटर, सॅनिटेशन अ‍ॅन्ड हायजीन (WASH), टाटा ट्रस्ट्स , म्हणतात, साफ पाणी आणि खाजगी जागेचा अभाव अंघोळीसाठी, पॅड बदलण्यासाठी, किंवा त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी या सगळ्यामुळे मुलींना पाळीच्या काळात सुरक्षित आणि सन्मानाने वागणं अवघड होतं. या अडथळ्यांमागे केवळ पायाभूत सुविधांचा अभावच नाही, तर मानसिक, सामाजिक बंधनंही आहेत. ही मोहिम या सगळ्या अडथळ्यांवर मात करत, मासिक पाळीला "लाजेची गोष्ट" न बनवता, आरोग्याचं साधं लक्षण मानायला शिकवते.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात