लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अमृत महोत्सवी वर्षांत पदार्पण

विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभीष्टचिंतन, समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल


पनवेल : दानशूर व्यक्तिमत्त्व, माजी खासदार आणि समाजाच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वयाची ७४ वर्षे पूर्ण करत ७५ व्या वर्षांत अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. या विशेष प्रसंगी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, साहित्य, वैद्यकीय, सांस्कृतिक, विधी, कला, सांस्कृतिक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे अभीष्टचिंतन करून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे द्वारकाशारदापीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामिश्री सदानंद सरस्वती महाराज यांनी स्वतः उपस्थित राहून लोकनेते रामशेठ ठाकूर यांना तसेच त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद दिले. यावेळी अनेक मान्यवरांनी 'लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस म्हणजे समाजाचा वाढदिवस' असे गौरवोद्गार काढले.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, सांस्कृतिक, साहित्य, क्षेत्रातील योगदान अनन्य साधारण आहे. राजकीय व आर्थिक शक्ती लोक कल्याणासाठी सार्थकी लावणारा नेता म्हणून त्यांची ओळख नेहमीच अधोरेखित झाली असून त्यांचा माणसावर अधिक विश्वास आहे. त्याचबरोबर सामान्य माणसाला काय हवे याची जाणीव त्यांना कायम राहिली. स्वतःच्या खिशातून जास्तीतजास्त मदतीचा हात देण्याचा प्रयत्न त्यांनी कायम ठेवला आहे. वयाच्या ७५ व्या वर्षीही त्यांचे सामाजिक कार्य अखंडपणे सुरूच आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात आणि तळागाळातही त्यांच्या विचारांचा पगडा कायम आहे. विविध क्षेत्रातील योगदान आणि दानशूरता यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना समाजाने 'लोकमान्य लोकनेता' अशी उपाधी बहाल केली. सामान्य माणूस त्यांचा केंद्रबिंदू राहिला आहे, त्यामुळे प्रत्येक माणसाच्या मनात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घर केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जात, पात, धर्म, पक्ष असा कधीही भेदभाव मानला नाही.


आपल्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी करायची आणि त्यामुळे माणुसकी हाच त्यांचा धर्म कायम राहिला आहे. त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांची लोकांप्रती असलेली त्यांची समर्पण भावना खऱ्या अर्थाने सुवर्ण अक्षराचे पान आहे. त्यांची कीर्ती महान आणि सर्व समाजाला मार्गदर्शक आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आधारवड असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांची हजारोंच्या संख्येत अर्थात अफाट गर्दी झाली होती.


लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्यावतीने पनवेलमध्ये तीन दिवसीय भव्य 'अमृतमयी कीर्तन महोत्सव' आयोजित करण्यात आला होता. भजन, कीर्तन, सामुदायिक हरिपाठ, गुरुतुल्य कीर्तनकार महाराजांचा सन्मान समारंभपूर्वक करण्यात आला. या महोत्सवाला वारकरी संप्रदायातील हजारोंच्या संख्येने मंडळी उपस्थित राहिली तर दहा हजारहून अधिक भाविकांनी या कीर्तन महोत्सवाचा लाभ घेतला.


श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व अखिल भारतीय नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला. तसेच रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि योनेक्स सनराइज् यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्यावतीने 'एक कृतार्थ संध्याकाळ' या साहित्यिक कार्यक्रमांतर्गत कवी संमेलन परिसंवाद,सन्मान पुरस्कार सोहळा, रायगड जिल्हा युवा मोर्चाच्यावतीने वर्षभर रक्तदान शिबिर उपक्रम आयोजित करण्यात असून या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी हा एक विशेष 'रक्तदान उपक्रम' हाती घेण्यात आला असून विविध विभागात वृक्षारोपण, आरोग्य शिबीरेही आयोजित करण्यात आले, अशाप्रकारे विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Comments
Add Comment

Virar Alibaug Corridor : विरार-अलिबाग कॉरिडॉर : शेतकऱ्यांच्या जमिनींचे सक्तीचे भूसंपादन तातडीने स्थगित करा- आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : विरार-अलिबाग (Virar-Alibuag) बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पासाठी पनवेल आणि उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळती; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, ३४ कामगारांची तब्येत बिघडली

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची

NMIA : नवी मुंबई विमानतळामुळे महामुंबईतील कनेक्टिव्हिटी झाली मजबूत

नवी मुंबई विमानतळ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे (NMIA) केवळ हवाई वाहतुकीच्या क्षेत्रातच नव्हे, तर

Bharat Gogawale : १५ ऑगस्टला रायगडमध्ये मीच झेंडा फडकवणार!

- मंत्री भरत गोगावले; येत्या २४ तासांत पालकमंत्री म्हणून घोषणा होणार असल्याचा दावा मुंबई : महायुती सरकारमध्ये

Majha Dusrikade Hay Suru : 'माझं दुसरीकडं हाय सुरू' गाण्यावर रील करणारे ST महामंडळाचे कर्मचारी ३ दिवसांच्या निलंबनानंतर पुन्हा सेवेत, सेवेत येताच केला नवा Video

पनवेल : राज्य परिवहन विभागाच्या गणवेशात वैयक्तिक प्रसिद्धीसाठी रील / शॉर्ट व्हिडीओ करण्यास बंदी आहे. या बंदीचे