ह.भ.प. अश्विनी महाराज टाव्हरे यांची पर्यावरण प्रबोधनाची वारी; कीर्तनाच्या माध्यमातून पर्यावरणाचा जागर!

  60

मुंबई : कीर्तनातून रंजन करता-करता डोळ्यांत अंजन घालण्याची किमया कीर्तनकार पार पाडीत असतात. आपल्या कृतीतून, वाणीतून समाजमनावर सकारात्मक संस्कार करण्याचं काम सातत्याने कीर्तनकार करीत असतात.


ह.भ.प. अश्विनी महाराज टाव्हरे बारामती, पुणे इथल्या इंग्रजी माध्यमात शिक्षिका म्हणून काम करीत असतानाच महिला कीर्तनकार म्हणून नावारूपाला आल्या. अध्यात्माचा आणि पर्यावरणाचा सुवर्णमध्य साधून ह.भ.प. अश्विनी महाराज टाव्हरे यांचा चालू असलेला प्रवास अविश्वसनीय आहे. आपलं कर्तव्य बजावत असताना पर्यावरणासाठी काही तरी करावं, या उद्देशानं त्या ज्या-ज्या खेडेगावात कीर्तनासाठी जातात तिथं-तिथं एक रोप लावत आणि त्या रोपाची काळजी घेण्याची जबाबदारी तिथल्या गावकऱ्यांवर सोपवतात. पुन्हा त्याच ठिकाणाहून कीर्तनाचं निमंत्रण आल्यावर दिलेल्या रोपाची योग्य ती निगराणी राखली जाते का, त्याची काळजी घेतली जाते का... हे पाहूनच त्या कीर्तनाला होकार किंवा नकार देतात.


आपल्या या कृतीतून पर्यावरण शिक्षणाची एक चळवळ त्यांनी निर्माण केली आहे. 'आजूबाजूला अनेक नकारात्‍मक गोष्‍टी घडत असल्‍या तरी त्‍यांतील सकारात्‍मक बाबींवर लक्ष केंद्रित करून त्‍यांना प्रकाशझोतात आणण्‍याचं काम मला महत्त्वाचं वाटतं, ' असं ह.भ.प. अश्विनी महाराज टाव्हरे म्हणतात.



'माझ्या कीर्तनातून समाजाला आदर्शांकडे नेण्याचा माझा प्रयत्न आहे.' असं त्या सांगतात. परिवर्तनाचा प्रयत्न करत आपल्या धरणीमातेला, निसर्गाला, पर्यावरणाला समृद्ध करण्याचा त्यांचा संकल्प त्यांना वेगळं ठरवतो.


येत्या ५ जूनला ‘पर्यावरण दिन’ आहे. या दिनाचं औचित्य साधत त्यांच्या कीर्तन सादरीकरणाचा विशेष भाग 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये रंगणार आहे. या शोमध्ये ह. भ. प. अश्विनी महाराज टाव्हरे आपल्या कीर्तनातून प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकतील.


'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' हा रिअ‍ॅलिटी शो सोमवार ते शनिवार, सकाळी ८.०० वाजता सोनी मराठी वाहिनीवरून प्रसारित होत आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल