Gold Silver Rate Today: सोन्याचे भाव तुफानी, चार आठवड्यातील किंमतीचा उच्चांक काय कारण आहेत जाणून घ्या !

प्रतिनिधी: पुन्हा एकदा सराफ बाजारात सोन्याने कमाल केली आहे. चार आठवड्यातील सोन्याचे भाव नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची वाढती मागणी, गोल्ड फ्युचर निर्देशांकात होणारी सतत वाढ, नफा बुकिंग (Profit Booking)साठी करण्यात येणारी गुंतवणूक अशा विविध कारणांमुळे आदल्या दिवशी प्रमाणेच सकाळी सोने भाववाढ झाली आहे.

'गुड रिटर्न्स ' या संकेतस्थळावरील माहितीनुसार सोन्याच्या प्रति ग्रॅम भावात २२ रुपयांनी वाढ झाली आहे. काल २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम ३३ रूपयांनी वाढ झाली होती ती कायम राहत आणखी २२ रूपयांनी वाढ झाल्याने प्रति ग्रॅम सोने किंमत ९९०६ रूपयांवर पोहोचली आहे. तर २२ कॅरेट प्रकाराच्या सोन्याची किंमत प्रति ग्रॅम २० रुपयांनी वाढून प्रति ग्रॅम किंमत ९०८० रुपयांवर पोहोचली आहे. १८ कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅम किंमत १७ रूपयांनी वाढत ७४३० रुपयांवर पोहोचली. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, पुणे, हैद्राबाद, अहमदाबाद अशा प्रमुख शहरांत प्रति ग्रॅम किंमत ९९०६ पर्यंत पोहोचली आहे. चांदीच्या भावात कुठलाही बदल झालेला नसून किंमत 'जैसे थे 'आहे.

एमसीएक्स (Multi Commodity Exchange) मध्ये सोन्याच्या निर्देशांकात ०.२० टक्क्यांनी घट होत किंमत ९७७६० रुपयांवर तर चांदीत ०.६८ टक्क्यांनी घट होत किंमत १००३२५ रुपयांवर पोहोचली. सकाळपर्यंत गोल्ड स्पॉट दरात ०.६० टक्क्यांनी घट होत किंमत ३३६१.२१ युएस डॉलरवर पोहोचली होती. तर सकाळी १२ पर्यंत गोल्ड फ्युचर निर्देशांकात (Gold Future Index) ०.३५ टक्क्यांनी घट होत किंमत ३३८५.०५ युएस डॉलरवर किंमत पोहोचली आहे.

आंतरराष्ट्रीय दबाव कायम असतानाच अमेरिकन बाजारातील मेटलची आवक जावक यामध्ये नव्या अमेरिकन धोरणाचा परिणाम होत आहेच तरी युएसकडून अद्याप आयत दर कपातीची घोषणा केली गेली नसली तरी अमेरिकेने युरोपियन युनियन व इतर देशांशी आयातीवरील ५० टक्के अतिरिक्त शुल्कावर बोलणी सुरू करण्यास सामर्थ्य दर्शविले आहे.तरीदेखील बाजार विश्लेषकांनी रोजगार डेटा, तसेच परकीय गुंतवणूक यावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले होते.

गेल्या आठवड्यातील आयात केलेल्या स्टील आणि ॲल्युमिनियमवरील शुल्क दुप्पट करण्याची अमेरिका योजना आखत आहे. दरम्यान, युरोपियन कमिशनने शुल्क सवलतीसाठी जोर देण्याची योजना आखली आहे.
Comments
Add Comment

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील