Saturday, June 14, 2025

स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय गांधी यांचे निधन

स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय गांधी यांचे निधन

मुंबई : १९४२ च्या चलेजाव आंदोलनातील विलेपार्ले येथील स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय गांधी उर्फ आप्पा (वय १०२) यांचे मंगळवार (दि.३) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार कोणतेही विधी न करता देहदान करण्यात येणार आहे.


आप्पा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले तुरूंगात गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेवटपर्यंत सामाजिक कार्यात सक्रिय होते. लोकशाही, समता आणि धर्मनिरपेक्षता याबाबत ते आग्रही राहिले. त्यांच्या सडेतोड भूमिका सर्वश्रुतच आहेत.



दत्ता गांधी हे राष्ट्र सेवा दलाच्या महाड शाखेचे कार्यकर्ते होते. महाड येथील शालेय शिक्षणादरम्यान स्वातंत्र्यलढ्याकडे वळले. १९४२च्या भारत छोडो आंदोलनात गांधींचा उत्स्फूर्त सहभाग होता. वातावरणामुळे उत्साही होऊन त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्या शाळेत मोर्चा काढला आणि बहिष्कार टाकला.

Comments
Add Comment