जागतिक पातळीवर अर्थविश्व कोमात भारतीय अर्थव्यवस्था मात्र जोमात !

भारतीय बाजाराचा जगभरात बोलबाला बँक ऑफ बडोदाच्या नव्या अहवालात स्पष्ट

मुंबई: जागतिक बाजारपेठेत द्वंद्व असले तरी भारतात विकासाचा दर सुसाटच राहणार आहे.वैश्विक बाजारातील अनिश्चिततेचे परिणाम भारतात तितकेसे होणार नाही असे भाकीत बँक ऑफ बडोदाच्या नवीन अहवालात निष्पन्न झाले आहे.नुकत्याच बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) जाहीर केलेल्या नव्या अहवालात मागील तिमाहीतील कामगिरी समाधानकारक होती असे म्हटले आहे.बाजारातील प्रतिकूल परिस्थितीतही ही वाढ देशाने नोंदवली असल्या कारणाने अहवालात हे परिक्षण नोंदवले गेले.

या अहवालातील माहितीनुसार,भविष्यातही विकासाची गाडी कायम राहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. मागील चौथ्या तिमाहीत (Q4 Results) मधील भारताची आकडेवारी ही समाधानकारक होती. तज्ञांनी नोंदवलेल्या निरिक्षणाहून अधिक आकडेवारी नोंदवली गेली होती. गेल्या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत यंदा मात्र कमी कामगिरी नोंदवली गेली.आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये देखील हे सकारात्मक चित्र कायम राहणार असून त्याची पुनरावृत्ती होऊ शकते असे बँक ऑफ बडोदा अहवालात म्हटले गेले आहे.

विशेषत इन्फ्रास्ट्रक्चर (पायाभूत सुविधा),व सेवा क्षेत्रात निव्वळ वाढ होण्याची शक्यता वर्तवली असून एफएमसीजी,कंज्युमर,ग्रामीण क्षेत्रातील वाढती सुविधांची मागणी या कारणाने ही वाढ होऊ शकते.

अहवालातील माहितीनुसार,चौथ्या तिमाहीत सर्वेक्षणातील नमुना (Sample)म्हणून घेतलेल्या १८९३ कंपन्यांच्या निव्वळ विक्रीत (Net Sales) ५.४ टक्क्यांनी वाढ तर निव्वळ नफ्यात (Net Profit) मध्ये ७.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळेच एका अर्थाने कंपन्यांना पुनर्रचना करण्यासाठी वाव मिळणार असून यातून कंपन्यांना आपल्या खर्चात कपात करतानाच जुनी थकबाकी चुकवण्यासाठी कंपन्यांना मदत होईल असे अहवालात म्हटले आहे.

भारतातील एकूणच मागणी पुरवठा समीकरणात संतुलन साधणे देशाला शक्य होऊ शकते. याशिवाय अहवालानुसार बीएफएसआय (BFSI) मधील वाढ किंचीत खुंटली जाऊ शकते असा अंदाज अहवालात स्पष्ट झाला.अहवालात असे नमूद केले आहे की,येत्या काही महिन्यांत वस्तूंच्या किमती स्थिर,भारतातील कमी चलनवाढ,अनुकूल मान्सूनचा अंदाज,व्यापार करार,पायाभूत सुविधांवर सरकारी खर्च आणि कर लाभ हे वाढ आणि मागणीचे महत्त्वाचे घटक असतील. तथापि, तेल आणि वायू, कापड आणि लोखंड आणि पोलाद यासारख्या मोठ्या क्षेत्रांमध्ये विक्रीत काही प्रमाणात मंदी दिसून आली. याचा नमुन्याच्या एकूण कामगिरीवर नकारात्मक परिणाम झाला. परंतु अहवालात असे सुचवण्यात आले आहे की ही कदाचित एकदाच घडणारी घटना आहे आणि दीर्घकालीन चिंता नाही.
Comments
Add Comment

संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली

मुंबईत पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक

मुंबई : कांदिवली आणि बोरिवली विभागादरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे २०/२१

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

बायोकॉन हेल्थकेअर कंपनीकडून ४१५० कोटीची QIP निधी उभारणी

मोहित सोमण: बायोकॉन या जागतिक दर्जाच्या हेल्थकेअर कंपनीने ४१५० रूपयांची गुंतवणूक इक्विटी क्यूआयपी (Qualified Institutional

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण