राष्ट्रभाषेबद्दल कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने जिंकले समस्त भारतीयांचे मन, सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्पेन दौऱ्यावर

हिंदी भाषेच्या सक्तीचा आरोप करणाऱ्या कनिमोळींनी राष्ट्रभाषेवर दिलेल्या उत्तरानंतर लोकांनी केला टाळ्यांचा कडकडाट 


माद्रिद: दक्षिण भारतातील राज्यांमध्ये भाषेच्या मुद्द्यावरुन गेल्या काही महिन्यांपासून वादंग पेटलेले मिळत आहे. भारतात भाषिक मुद्यांवरून कितीही राजकीय डावपेच रचले जात असले तरी, आंतरराष्ट्रीय पातळीवर  भारतीय राजकारण्याची भूमिका कौतुक करण्यासारखी आहे.  'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) वर भारताची बाजू मांडण्यासाठी परदेश दौऱ्यावर गेलेले सर्वपक्षीय शिष्टमंडळ (All-party delegation) जागतिक स्तरावर भारताची मान उंचावताना दिसत आहे. ज्यामधील एक शिष्टमंडळ द्रमुक खासदार कनिमोळी (Kanimozhi Karunanidhi) यांच्या नेतृत्वाखाली स्पेनची राजधानी माद्रिद येथे पोहोचलं आहे. तिथल्या माध्यमांशी आणि अनिवासी भारतीयांशी संवाद साधताना कनिमोळी यांनी राष्ट्रभाषेच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कनिमोळी यांच्या उत्तरानंतर सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला.


तामिळनाडूच्या सत्ताधारी पक्षाच्या द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांनी भाषेबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊन १४० कोटी भारतीयांची मने जिंकली. भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांनी सोमवारी स्पेनमध्ये बोलताना म्हटलं की, भारताची राष्ट्रभाषा एकता आणि विविधता आहे. हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगाला हाच संदेश देण्यासाठी आले आहे.


दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंदीला विरोध वेगाने वाढत असतानाच द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनी हे विधान केले आहे. द्रमुकने अलीकडेच केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये समाविष्ट केलेल्या त्रिभाषिक सूत्राला विरोध केला आहे.



भारताची राष्ट्रभाषा कोणती? या प्रश्नांवर कनिमोळींनी दिले हे उत्तर




"तुम्हाला भारताच्या राष्ट्रीय भाषेबद्दल जाणून घ्यायचे आहे, मला वाटते की भारताची राष्ट्रीय भाषा ही विविधतेत एकता आहे. हाच संदेश हे प्रतिनिधी मंडळ जगाला देत आहे आणि हीच आजची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे," असं कनिमोळी म्हणाल्या. कनिमोळी यांच्या या विधानानंतर, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.


यादरम्यान कनिमोळी यांनी जगाला दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहनही केले. आता संपूर्ण जगाने दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याची वेळ आली असल्याचे कनिमोळी म्हणाल्या. याआधी कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी पाकिस्तान दहशतवाद्यांचा कारखाना असल्याचे म्हटलं होतं.


Comments
Add Comment

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१

बांगलादेशात रक्तरंजित राजकीय संघर्ष

आणखी एका हसीनाविरोधी नेत्याला घरात घुसून घातल्या गोळ्या बांग्लादेश : बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आणखी एका

बांगलादेशमध्ये उस्मान हादी पाठोपाठ मोहम्मद मोतालेब शिकदारची हत्या

ढाका : बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी

दक्षिण आफ्रिकेत गोळीबारात १० जण ठार

जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियामध्ये बाँडी बीचवर बेछूट गोळीबार करण्याची घटना ताजी असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतील

बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने