IPL फायनलपूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर मोठा स्फोट, पसरले भीतीचे वातावरण

अहमदाबाद:  आयपीएल 2025 (IPL 2025) चा अंतिम सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी  एक दुर्दैवी घटना घडली आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर मोठा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. सामना सुरू होण्यापूर्वीच स्टेडियमबाहेर सकाळच्या सुमारास अचानक झालेल्या मोठ्या धमाक्यामुळे सध्या भीतीचे वातावरण आहे.


आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यादरम्यान आयपीएल 2025चा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना आज संध्याकाळी रंगणार आहे, त्यामुळे सामना बघण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची दुपारपासूनच सुरुवात होणार आहे, पण त्यापूर्वीच  स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमजवळच्या फूटपाथवर अन्न आणि पेय विकणाऱ्या लोकांच्या निष्काळजीपणामुळे हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. पण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


दरम्यान ही दुर्घटना सकाळी घडली त्यामुळे मोठी जीवितहानी झाली नाही, पण जर हा स्फोट सामनादरम्यान किंवा गर्दीच्या वेळी झाला असता तर काय गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती, याची कल्पना देखील करवत नाही.



ऑपरेशन सिंदूर मोहिमेवर भव्य लेजर शो


दरम्यान आजच्या IPL समारोप समारंभासाठी बीसीसीआयने एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या भव्य यशाबद्दल बीसीसीआयद्वारे सैन्याच्या सन्मानार्थ नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमात भारतीय गायक एका खास लष्करी बँडसह देशभक्तीपर गाणी गातील. समारोप समारंभ देखील खूप खास असणार आहे. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन भारतीय सशस्त्र दलांना अद्भुत आदरांजली अर्पण करतील. त्यांच्या सादरीकरणातून ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या शूर सैनिकांचा सन्मान केला जाईल आणि पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.

Comments
Add Comment

'न्यूझीलंड'ने इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल!

कोहलीची झुंजार खेळी व्यर्थ; भारताचा ४१ धावांनी पराभव इंदोर (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड संघाने भारताचा तिसऱ्या

किवींच्या 'मिशेल-फिलिप्स'चा झंझावात; निर्णायक वन-डेमध्ये भारतासमोर हे लक्ष्य

इंदूर (वृत्तसंस्था): भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वन-डे मालिकेतील

Shubman Gill water purifier : मॅचपेक्षा पाण्यावर लक्ष! शुभमन गिलने इंदूरमध्ये नेले ३ लाखांचे वॉटर प्युरिफायर

इंदूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वन-डे मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे, त्यामुळे इंदूरमध्ये होणारा तिसरा

भारतीय संघाच्या टी-२० विश्वचषक मोहिमेला सुरुंग

सुंदर दुखापतग्रस्त; आयुष बदोनीला संधी? मुंबई : आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या तोंडावर भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणीत

टी-२० मध्ये शतकांच्या यादीत डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या स्थानावर

विराट कोहलीचा विक्रम मोडला मुंबई : ३९ वर्षीय डेव्हिड वॉर्नरने बिग बॅश लीगमध्ये पुन्हा धावांचा पाऊस पाडला. सिडनी

विराट कोहलीच्या बाबतीत आयसीसीने चूक वेळीच सुधारली

८२५ नव्हे, तर १५४७ दिवस होता अव्वल स्थानी मुंबई : विराट कोहलीने आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत चार