माथेरान येथे वाहतूक कोंडीचा तिढा कायमच; पर्यटकांचे हाल

ठोस उपाययोजना नाही; लक्ष देण्याची प्रवाशांची मागणी


माथेरान : दरवेळी सुट्ट्यांच्या हंगामात माथेरान दस्तुरी नाक्यावर आणि घाटरस्त्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेहमीच्या या वाहतूक कोंडीचा तिढा सोडविण्यासाठी प्रशासनाने जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचे सर्वच स्तरातून बोलले जात आहे.



शनिवारी आणि रविवारी माथेरानला पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नेरळ माथेरान हा एकमेव घाटरस्ता असल्याने आणि दस्तुरी वाहन पार्किंगमध्ये अपुरी पार्किंग व्यवस्था यामुळे पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मुंबई-पुण्यापासून जवळचे ठिकाण असल्याने माथेरानला सर्वाधिक पसंती दिली जाते त्यामुळे इथे पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. प्रवासी कर आणि वाहन कराच्या माध्यमातून नगरपालिका आणि वनखात्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न प्राप्त होते. परंतु येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक सेवासुविधा देण्यासाठी शासन स्तरावर आजमितीपर्यंत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. जग एकविसाव्या शतकात वाटचाल करत असताना इथे अद्यापही पर्यायी व्यवस्था निर्माण होऊ शकली नाही. जो पर्यटक आपल्या लहान मुलांना, वयोवृद्ध आई-वडिलांना इथे फिरावयास घेऊन येतो त्यांना साधी वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही. ही लाजिरवाणी बाब असल्याचे ज्येष्ठ मंडळी बोलत आहेत.

Comments
Add Comment

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर

नांदगाव मुरुड : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याच्या