PBKS vs MI, IPL 2025: मुंबईला हरवत पंजाब दिमाखात फायनलमध्ये, ३ जूनला आरसीबीशी टक्कर, अय्यरची तुफानी खेळी

अहमदाबाद: आयपीएल २०२५च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला हरवत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता ३ जूनला त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या तुफानी खेळीच्या जोरावर पंजाबला हा विजय साकारता आला.


फायनलसाठी दोन्ही संघासाठी हा अविस्मरणीय क्षण असेल. कारण दोन्ही संघ आपला पहिला खिताब जिंकण्यासाठी मैदानात असतील. य़ा सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टॉस जिंकत पंजाबने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, पावसाच्या व्यत्ययामुळे सामना दोन तास उशिराने सुरू झाला. मात्र एकाही षटकाची कपात केली नाही. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना सूर्या आणि तिलक यांच्या शानदार खेळीच्या जोरावर आणि नमन धीरच्या आतिषबाजी खेळीच्या जोरावर पंजाबसमोर विजयासाठी २०४ धावांचे आव्हान ठेवले होते. पंजाबने हे आव्हान १९व्या षटकांत ५ विकेट राखत पूर्ण केले.


आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची सुरूवात खराब राहिली. त्यांनी प्रभसिमनरची विकेट स्वस्तात गमावली. प्रभसिमनर ६ धावा करत ट्रेंट बोल्टच्या बॉलवर बाद झाला. यानंतर जोश इंग्लीश आणि प्रियांश यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी झाली. प्रियांश २० धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने पंजाब किंग्सला तिसरा झटका दिला. त्याने जोश इंग्लिशच्या खेळीचा अंत केला. इंग्लिशने ५ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २१ बॉलमध्ये ३८ धावा ठोकल्या. यानंतर श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा यांच्यात शानदार भागीदारी झाली. मात्र १६व्या षटकांत नेहाल वढेराची विकेट पडली. नेहालने ४८ धावांची खेळी केली. मात्र श्रेयस अय्यर टिकून होता. त्याने २७ बॉलवर अर्धशतक ठोकले. यातच १७व्या षटकांत शशांक सिंह बाद झाला. यानंतर अय्यरने मोर्चा सांभाळला आणि कर्णधाराला साजेशी खेळी करत १९व्या षटकांत विजय मिळवून दिला.



असा होता मुंबईचा डाव


टॉस झाल्यानंतर अचानक आलेल्या पावसामुळे सामना दोन तास उशिराने सुरू झाला. डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्ट्रो यांनी केली. मात्र त्यांची सुरूवात चांगली झाली नाही. तिसऱ्याच षटकांत स्टॉयनिसने रोहित शर्माची विकेट घेतली. स्टॉयनिसचे हे हंगामातील पहिलीच विकेट होती. यानंतर तिलक वर्मा आणि बेअरस्ट्रॉने मुंबईला सांभाळले. ६ षटकानंतर मुंबईची धावसंख्या १ बाद ६५ होती. मात्र ७व्या षटकांतील शेवटच्या बॉलवर मुंबईला दुसरा झटका बसला. बेअरस्ट्रॉने ३८ धावा करत बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोघांनी मुंबईचा स्कोर १० षटकांत १०० पार नेला. मात्र १४व्या षटकांत सूर्याच्या रूपाने तिसरा झटका बसला. तो ४४ धावा करत बाद झाला. यानंतर पुढच्याच षटकांत तिलक वर्माही ४४ धावा करून बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्या आणि नमन धीर यांच्यात चांगली खेळी झाली. मात्र १८व्या षटकांत हार्दिकची विकेट पडली. यानंतर नमन धीरने चांगली खेळी करत मुंबईचा स्कोर २०० पार नेला. नमनने १८बॉलमध्ये ३७ धावा ठोकल्या.

Comments
Add Comment

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र

IND vs PAK : महिला क्रिकेट संघही पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नाही

नवी दिल्ली : दुबईतील आशिया कप दरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघाप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे होणाऱ्या

IND vs WI: शुभमन गिल पुन्हा ठरला 'अनलकी'! सलग सहाव्यांदा नाणेफेक गमावली

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये

अभिषेक शर्माने रचला इतिहास! ICC T20I फलंदाजी क्रमवारीत आजवरचे सर्वोच्च रेटिंग

नवी दिल्ली: भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)