'मोबाईल छोडो, पुस्तक जोडो' अभियानास प्रारंभ

  65

मुंबई (प्रतिनिधी) : सध्याच्या तरुण पिढीला मोबाईलचे व्यसन लागले आहे. या अतिरेकी व्यसनातून सोडविण्यासाठी 'मोबाईल छोडो, पुस्तक जोडो' अभियान सुरु करत आहोत, मुंबईकरांनी या महाअभियानात मोठया संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन 'शांतीदूत सेवा संस्थे'चे अध्यक्ष व भायखळ्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय (बुवा) कुलकर्णी यांनी केले आहे.


'सबुरी वस्ती स्तर संघ' आणि 'शांतीदूत सेवा संस्था' यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील राणीबाग जवळील लुनावा भवन सभागृहात 'दहावी आणि बारावीमधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी शिक्षण तज्ज्ञ व बिझनेस कोच सुशील भालचंद्र मुणगेकर, लेखक व चित्रपट निर्माते ज्ञानेश्वर विश्वनाथ मर्गज यांनीही विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.


'मोबाईल छोडो, पुस्तक जोडो अभियाना'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर, महापुरुषांची चरित्रे, स्पर्धा परीक्षा यांसारखी पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील, यासाठी ग्रंथालये उभारण्याचा मानसही कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी सुशील भालचंद्र मुणगेकर यांनीही पालक व विद्यार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योजक व प्रशिक्षक सुगत प्रिय शिंदे, पत्रकार महेंद्र गावडे, सतीश खांडगे, गणेश धायगावे, दर्शन सावंत, संजय साळुंके, रमेश गोड, संजय पन्हाळकर, दिपाली कन्नन नायडू, अर्चना रमेश गोड, नैना लोगडे, श्रीया सचिन शिंदे, वैशाली पवार, कन्नन नायडू, सचिन शिंदे, दर्शना सावंत, स्वप्नाली जाधव, जयेश आंब्रे, डॉली साव, अश्विनी नवघणे, पल्लवी जाधव, मोहम्मद युसूफ शेख, अब्दुल अली खान, रमेश गोड, राज धायगावे, सुभाष वळंजू, अशोक पांचाळ, गणेश थोरात यांनी विशेष प्रयत्न केले.

Comments

Kulkarni    June 6, 2025 02:38 PM

Instead of writing Double name of Darshana Sawant, ramesh Goad, you should add new names Vaishali Umesh Jangam and Prnjal Raju More. And the english speech given by Pratibha Nikhil Gade.

Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही