सिक्कीम : सिक्कीमच्या लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता

गंगटोक : ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पाऊस आणि भूस्खलनाने हाहाकार माजवाला आहे. सिक्कीममधील एक लष्करी छावणीत रविवारी (दि.१) संध्याकाळी भूस्खलन झाले. यामध्ये काही सैनिकांसह ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर ९ जवान बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.


तीन जणांचा मृत्यू


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.१) संध्याकाळी ७ वाजता उत्तर सिक्कीममधील चट्टन येथील लष्करी छावणीत भूस्खलन झाले. यामुळे आजूबाजूच्या परिसरात बांधलेल्या घरांचे मोठे नुकसान झाले. या भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक बेपत्ता आहेत. मृतांची ओळख पटविण्यासाठी आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी मोहीम रबवली जात आहे.

१५०० पर्यटक अडकले


उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, लोचन आणि लाचुंग भागात सुमारे १५०० पर्यटक अडकले आहेत. मंगन जिल्ह्याचे एसपी सोनम देचू भुतिया म्हणाले की, ११५ पर्यटक लाचेनमध्ये आणि १,३५० पर्यटक लाचुंगमध्ये राहत आहेत. भूस्खलनामुळे दोन्ही बाजूंनी रस्ते बंद करण्यात आले आहेत. सर्व पर्यटकांना सध्या त्यांच्या हॉटेलमध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Comments
Add Comment

जगभरातील वेबसाइट्स आणि अ‍ॅप्स ठप्प: AWSमध्ये बिघाड, युजर्सना मोठा फटका

नवी दिल्ली : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जगभरातील लाखो इंटरनेट युजर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

मुस्लिम महिलांनी केली श्रीरामाची आरती!

धर्म बदलू शकतो, पण पूर्वज आणि संस्कृती बदलू शकत नाही - नाजनीन अन्सारी वाराणसी : दिवाळीच्या सणादरम्यान, उत्तर

पंतप्रधान मोदींनी आयएनएस विक्रांतवर नौदलासोबत साजरी केली दिवाळी

पणजी : संपूर्ण देश आज दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करत आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शूर

उत्पादनांवर ‘ओआरएस’ नाव वापरण्यास मनाई

भारतीय अन्् सुरक्षा आिण मानके प्राधिकरणाचे निर्देश हैदराबाद  : अन्न व्यवसाय संचालकांनी (एफबीओ) त्यांच्या खाद्य

मेंदूची कार्यक्षमता वयाच्या ५५ ते ६० वर्षांदरम्यान असते शिखरावर !

पर्थ : जसजसे वय वाढत जाते, तसतसे आपण स्वत:ला कमकुवत समजतो. आता आपली कार्यशक्ती कमी झाली असे आपल्याला वाटते, पण

चॅट जीपीटीला टक्कर देणार स्वदेशी सर्वम एआय

हिंदीसह १० भारतीय भाषांमध्ये साधणार संवाद नवी दिल्ली  : भारताच्या स्वदेशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मॉडेल