Election: प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगाची राज्य सरकारला सूचना

मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तयारीला सुरूवात केली आहे. निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधीत सूचना करण्यात आल्या आहेत. आगामी ४ महिन्यात निवडणूक घ्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिले होते.


राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. या निवडणुकांसाठी ४ आठवड्यांमध्ये प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने त्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवात देखील केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना करण्यात आली आहे. प्रभाग रचनेची माहिती राज्य सरकारने निवडणूक आयोगाला दिल्यानंतर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्य सरकारकडून या आठवड्यात प्रभाग रचनेची माहिती निवडणूक आयोगाला सादर केली जाण्याची शक्यता आहे.


सुप्रीम कोर्टाने मागच्या महिन्यात राज्य सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ४ महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने राज्य सरकारला 4 आठवड्यात आधीसूचना जारी करण्यासही सांगितले होते. त्यानुसार आता राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया करण्यास सुरूवात केली आहे. प्रभाग रचनेचे अधिकार महाविकास आघाडीच्या काळात सरकारने स्वत:कडे घेतले होते. आता प्रभाग रचना पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत.

Comments
Add Comment

अनुसूचित जातीच्या विविध रिक्त्त पदांच्या भरतीचा अनुशेष भरा!

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे मुंबई महानगरपालिकेला निर्देश मुंबई (खास प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य

मुंबईतील कुर्ला परिसरात गॅस पाइपलाइन गळतीमुळे लागली आग

मुंबई : कुर्ला पश्चिमे येथील विनोबा भावे नगरमधील एलआयजी कॉलनीच्या मागे असलेल्या मुबारक इमारतीत दुपारी गॅस

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांच्या न्यायाची हमी

मुंबई : ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांमध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुरावे गृहीत धरण्याची तरतूद

मुंबईतील चारकोप परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार, एक जण गंभीर जखमी

मुंबई : मुंबईतील चारकोप परिसरात आज दुपारी २ वाजता गोळीबार झाला. या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला

केंद्र सरकारची स्वच्छता मोहीम, रेशन यादीतून काढली २.२५ कोटी अपात्र नावं!

मुंबई : केंद्र सरकारद्वारे समाजातील गरीब कुटुंबांना योग्य अन्न पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी रेशन योजना लागू

मुंबईतील १३ प्रभागांमध्ये समान आरक्षणाची हॅट्रीक, सलग तिसऱ्या निवडणुकीतही आरक्षण राहिले सारखेच

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५करता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली. या प्रभाग