साई संस्थानच्या रुग्णालयात गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

रुग्णालयातील डॉक्टरांचे आणि संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक


शिर्डी: शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान रुग्णालयात ६५ वर्षीय रुग्णावर अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. या यशस्वी प्रयत्नाबद्दल रुग्णालयातील डॉक्टरांचे आणि संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.


नांदेड जिल्ह्यातील चांडोळा गावचे ६५ वर्षीय प्रल्हाद महाजन साखरे यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या हृदयाच्या वॉलमध्ये छिद्र (Ventricular Septal Rupture) निर्माण झाले होते. अनेक नामांकित रुग्णालयांतील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेतील सांभाव्य धोका पाहता त्यांना नकार दिला होता. अखेरचा उपाय म्हणून त्यांनी श्री साईबाबा रुग्णालयात धाव घेतली. येथेही संभाव्य धोका स्पष्ट करून डॉक्टरांनी कुटुंबीयांचा निर्णय मागितला. साईबाबांवरील श्रद्धेने प्रेरित होऊन कुटुंबीयांनी शस्त्रक्रियेस परवानगी दिली.



श्री साईबाबा रुग्णालयात ही अशी पहिलीच शस्त्रक्रिया


अखेर दिनांक २४ मे रोजी प्रल्हाद साखरे यांना श्री साईबाबा संस्थान रुग्णालयात दाखल केले. कार्डियाक सर्जन डॉ. श्रेयस पोतदार, भुलतज्ञ डॉ. गायत्री लक्ष्मी नागपुरे,अतिदक्षता तज्ञ डॉ.विजय नरोडे,न्युरोसर्जन डॉ मुकुंद चौधरी आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ. निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.  महत्वाची गोष्ट म्हणजे, श्री साईबाबा रुग्णालयात ही अशी पहिलीच शस्त्रक्रिया होती. संबंधित रुग्ण आता पूर्णपणे बरे झाले असून, आज, २ जून २०२५ रोजी त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. रुग्णाचे बंधू, खुशालराव साखरे यांनी डॉक्टरांचे विशेष आभार मानले आणि आनंदाश्रूंनी आपली भावना व्यक्त केली.


या यशस्वी प्रयत्नाबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, वैद्यकीय संचालक लेफ्ट. कर्नल डॉ. शैलेश ओक आणि उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

Comments
Add Comment

नागपुरात जड वाहनांना लाल सिग्नल : या वेळेत प्रवेश बंद !

नागपूर : नागपूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या आणि नागरिकांच्या त्रासाचा विचार करून वाहतूक

कोल्हापुरमध्ये १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू, खेळता खेळता आला हृदयविकाराचा झटका, आईच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तहसीलमधील कोडोली गावात एक दुःखद घटना घडली, श्रावण

बेकायदेशीर कत्तलीसाठी नेलेला जनावरांचा कंटेनर परभणीत जप्त, चालक ताब्यात

परभणी : पथरी-माजलगाव रस्त्यावरील पोखर्णी फाटा परिसरात बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा एक कंटेनर सतर्क

गणेशोत्सवाला गालबोट - पुण्यात गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या

पुणे : ऐन गणेश विसर्जनाच्या तयारीत असतानाच पुण्यामध्ये सणाला गालबोट लागले. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या

मराठा आरक्षण - मृतांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत

मुंबई : मराठा समाजास आरक्षण मिळण्याकरीता ज्यांनी आत्महत्या केली किंवा आंदोलना दरम्यान ज्यांचा मृत्यू झाला. अशा

Weather Alert: विसर्जनाच्या दिवशी मुसळधार पाऊस, आयएमडीचा महाराष्ट्रासाठी मोठा इशारा

नवी दिल्ली: आज महाराष्ट्रात अनंत चतुर्दशी साजरी केली जात असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनात सर्व