Chandrashekhar Bawankule : एक पेड माँ के नाम...... पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम

अमरावती : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त यावर्षी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरासमोर आईच्या नावाने एक झाड लावण्याचा अनोखा उपक्रम सुरू करून पर्यावरण दिवस साजरा करण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.हा अनोखा उपक्रम 'एक पेड माँ के नाम'नुसार राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्हा प्रशासनासह स्थानिक स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सर्व शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी सहभागी होतील.




'एक पेड माँ के नाम' हा उपक्रम ५ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिन हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले. जिल्ह्यातील सुमारे एक हजाराहून अधिक गावांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. यात १ लाखाहून अधिक वृक्षारोपण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच ४० हून अधिक स्वयंसेवी संस्था या उपक्रमात सहभागी होणार आहेत. वेगवेगळ्या भागातील १५ हजाराहून अधिक नागरिक या उपक्रमात सहभागी होणार आहेत.


या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरण संवर्धनाचे महत्व अधोरेखित करणे आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिक पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभागी होतील आणि पृथ्वीचे रक्षण करण्याचा संकल्प करतील. या अनोख्या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये