अंतिम फेरीत कोण, पंजाब की मुंबई?

ज्ञानेश सावंत : पात्रता फेरीत मुंबईने गुजरातचा २० धावांनी पराभव केला आणि आता अंतिम फेरीसाठी त्यांना पंजाब विरुद्ध खेळावे लागणार आहे. साखळीतील शेवटच्या सामन्यात पंजाबने मुंबईचा ७ बळींनी पराभव केला, त्यामुळे मुंबई आज त्याचा वचपा काढणार एवढे मात्र निश्चित. दोन्ही संघांची फलंदाजी आणि गोलंदाजी मजबूत आहे. श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून त्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत असून त्याला पाँटिंगची योग्य साथ मिळत आहे. आजही ते रोहित शर्मा, बेयरस्टो, सूर्यकुमार व तिलक वर्मा यांना कसे रोखायचे यासाठी व्यूहरचना नक्कीच आखणार आहेत. बुमराहची गोलंदाजी कशी खेळून काढली पाहिजे याचा नक्कीच अंदाज बांधणार. सध्या मुंबईचा सूर्यकुमार फॉर्ममध्ये आहे; पण पंजाबकडे युजवेंद्र चहल आहे, ज्याने सूर्याला तीन वेळा बाद केले होते.



रोहित शर्मा अर्शदीप विरुद्ध खेळताना चाचपडतो हे मुंबईसाठी चिंताजनक आहे. तीच चिंता पंजाबकडे सुद्धा आहे. मार्कस स्टोइनिस बुमराह विरुद्ध खेळू शकत नाही. असो. एकंदर दोन्ही संघ एकमेकांचे कच्चे दुवे शोधणारच; पण शेवटी जो संघ फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर मेहनत घेणार तोच विजयी ठरणार. नरेंद्र मोदी मैदान जास्तीत जास्त धावसांठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे आज कोणताही संघ प्रथम फलंदाजी करणार त्याला समोरच्या संघाला मोठे आव्हान द्यावे लागणार.

चला तर बघूया अतीतटीच्या लढतीत कोण यशस्वी ठरणार, श्रेयस की हार्दिक?
Comments
Add Comment

Jos Buttler T20 Record : क्रिकेट जगतात जोस बटलरचा डंका! पोलार्डला पछाडत बनला T20 मधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

नवी दिल्ली : इंग्लंडचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज जोस बटलरने (Jos Buttler) टी२० (T20) क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव

IPL 2027 : रिषभ पंत पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये ? कुलदीप यादव लखनऊ मध्ये !आयपीएल ट्रेडमध्ये कोणाला फायदा ?

Mumbai : आयपीएल २०२७ (IPL 2027) पूर्वी ट्रेडमुळे चर्चा रंगल्या आहेत. भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) पुन्हा

Virat Kohli : विराटभोवती विणला विजयाचा धागा

आयपीएल 2026 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने संघरचनेत महत्त्वाचे बदल करत भविष्यातील यशाचा मजबूत पाया रचण्याचा

IPL 2026 Final Tim David : टिम डेव्हिडला मोठा दणका! पंचांच्या दिशेने बर्फाची पिशवी फेकणं पडलं महागात; सामना शुल्काच्या ५०% दंड

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा स्फोटक फलंदाज टिम डेव्हिड (IPL 2026 Final

IPL 2026 Virat Kohli : आरसीबीच्या दुसऱ्या विजेतेपदानंतर विराट कोहलीची भावूक पोस्ट चर्चेत

नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने शानदार कामगिरी करत आयपीएल २०२६ चे विजेतेपद पटकावले. रजत पाटीदारच्या

Virushka Dance Video : RCB चा ऐतिहासिक विजय! विजयानंतरचा विराट - अनुष्काचा डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२६चे विजेतेपद पटकावल्यानंतर संपूर्ण क्रिकेटविश्वात जल्लोषाचे