Pratap Sarnaik: हिंदी मुंबईची बोलीभाषा म्हणणाऱ्या प्रताप सरनाईकांनी मांडली आपली बाजू

मुंबई: मीरा भाईंदरमध्ये हिंदी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी मुंबईची बोलीभाषा झालीय असं विधान केल्यानं त्यांच्यावर चौफेर टीका झाली. यादरम्यान त्यांनी हिंदीला लाडकी बहीण असे देखील म्हंटले होते, मात्र त्यानंतर निर्माण झालेल्या वादावर सरनाईक यांनी स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली आहे.


'मराठीचा मी सर्वाधिक सन्मान केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मी किती प्रयत्न केलेत हे सगळ्यांनाच माहिती आहे,' असे स्पष्टीकरण सरनाईकांनी दिले आहे. तसेच माध्यमांनी बातमी चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचेही त्यांनी म्हंटलं आहे.



माझ्या मतदारसंघात मी मराठीत बोलतो


मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की, मीरा भाईंदरमध्ये हिंदी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात हिंदी पत्रकारांचा सन्मान केला जात होता. त्यात कृपाशंकर सिंह यांच्या मुद्द्यांवर पुढे मी बोललो. माझ्या मतदारसंघात मी मराठीत बोलतो. पण मीरा भाईंदरमध्ये ८२ टक्के हिंदी भाषिक आहेत. तिथं हिंदीच बोलावं लागतं. त्यांनी पुढे असे देखील सांगितले की, "माझ्या मतदारसंघात मी विंदा करंदीकर, पु.ल. देशपांडे ते नामदेव ढसाळ यांच्यापर्यंत मोठ्या लेखक, साहित्यिकांची नावं रस्त्यांना दिली आहेत. मी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत. मराठीचाही सर्वाधिक सन्मान केला आहे."

Comments
Add Comment

नेव्हल परिसरातील रायफल चोरी प्रकरणात ट्विस्ट; आरोपी आणि तक्रारदार एकमेकांना ओळखतात

मुंबई: मुंबई पोलीस गुन्हे शाखेने 'नेवी नगर रायफल चोरी' प्रकरणाच्या तपासात एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. आरोपी

तुमच्याकडे गाडी आहे का? तर हे जरूर वाचा...

सीएटने सर्व टायरच्या किमती केल्या कमी मुंबई : भारत सरकारने अ

महावितरण पहिल्या क्रमांकावर, केंद्राच्या क्रमवारीत १०० पैकी मिळाले ९३ गुण

मुंबई : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या क्रमवारीत महावितरणने १०० पैकी ९३ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त, एसटीच्या ७५ बसस्थानकावर 'मोफत वाचनालय'

मुंबई: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या ७५ प्रमुख बस

७/११ बॉम्बस्फोटात निर्दोष सुटका झालेल्या व्यक्तीची चुकीच्या कारावासासाठी भरपाईची मागणी

मुंबई: ७/११ च्या मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोटात २०१५ मध्ये निर्दोष सुटका झालेली एकमेव व्यक्ती, अब्दुल वाहिद शेख

Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा; अलर्ट जारी

मुंबई : बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने आंध्र प्रदेश, ओडिशा आणि