PBKS vs MI, IPL 2025: पावसामुळे सामन्याला उशीर

अहमदाबाद: आयपीएल २०२५च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात टक्कर होत आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. हा सामना सेमीफायनलसारखाच आहे. कारण या सामन्यातील विजेता फायनलमध्ये आरसीबी संघाविरुद्ध खेळणार आहे. ३ जूनला आयपीएलचा फायनल सामना रंगणार आहे. पंजाब किंग्सने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पावसामुळे अद्याप खेळ सुरू होऊ शकलेला नाही. मैदान ओलं असल्यामळे सामना सुरू होण्यास उशीर होत आहे.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध एकतर्फी सामन्यात ८ विकेटनी पराभव स्वीकारल्यानंतर पंजाब किंग्सचा आत्मविश्वास थोडा कमी झाला आहे. आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील हा संघ पहिला आयपीएल खिताब जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न पणाला लावतील.


दुसरीकडे मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सला हरवत सहावे विजेतेपद जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. मुंबई इंडियन्सला नॉकआऊट सामन्यांमध्ये खेळण्याचा अनुभव इतर संघाच्या तुलनेत जास्त आहे.


पंजाब किंग्सचे संभाव्य प्लेईंग ११- प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, जोश इंग्लीश, श्रेयस अय्यर(कर्णधार), नेहाल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टॉयनिस, अजमतुल्लाह उमरजई, हरप्रीत ब्रार, काईल जेमिसन, अर्शदीप सिंह.


मुंबई इंडियन्सचे संभाव्य प्लेईंग ११ - रोहित शर्मा, जॉनी बेअरस्ट्रॉ, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या(कर्णधार), नमन धीर, राज अंगद बावा, मिचेल सँटनर, रिचर्ड ग्लीसन, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात