जून-जुलैपासून क्रिकेटमध्ये नवे नियम

  44

३४ षटकांनंतर एकाच चेंडूचा होणार वापर


मुंबई : आयसीसीने प्लेईंग-११ कंडिशन्समध्ये बदल केले आहेत. सुधारित नियमांची अंमलबजावणी कसोटी क्रिकेटमध्ये जूनपासून, तर मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये जुलैपासून होणार आहे. तशा सूचना आयसीसीने सदस्य देशांना दिल्या आहेत. प्लेईंग-११च्या परिस्थितीत सगळ्यात मोठे बदल आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये होणार आहेत. याला आयसीसीने हिरवा कंदील दाखवला आहे.


सध्याच्या घडीला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन्ही बाजूंनी दोन नव्या चेंडूंचा वापर होतो. पण आता नव्या नियमांनुसार, एका डावात सुरुवातीची ३४ षटकं दोन्ही चेंडूंचा वापर होईल. त्यानंतर ३५ व्या षटकापासू एक चेंडू डाव संपेपर्यंत दोन्ही बाजूने वापरला जाईल. ३४ वे षटक संपल्यानंतर आणि ३५ वे षटक सुरु होण्यापूर्वी क्षेत्ररक्षण करणारा संघ दोनपैकी एका चेंडूची निवड करेल. पाऊस किंवा अन्य कारणांमुळे सामन्यात व्यत्यय आल्याने २५ किंवा त्यापेक्षा कमी षटकांचा खेळ झाल्यास एकाच चेंडूचा वापर केला जाईल. जो चेंडू ३४ व्या षटकापर्यंत वापरला जाणार नाही, तो बॅकअप म्हणून ठेवला जाईल.



नियमांमध्ये करण्यात आलेले बदल एका कार्यकारी गटाकडे पाठवण्यात येतील, असे सुरुवातीला सांगण्यात आले होते. पण आता आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीने बदलांना मंजुरी दिलेली आहे. लवकरच एक कार्यकारी गट स्थापन केला जाईल. १९ वर्षांखालील विश्वचषक टी-२० स्पर्धा, ५० षटकांचे सामने हायब्रिड स्वरुपात खेळवायचे की नाही, याचा निर्णय हा गट घेईल. सिंगापूरमध्ये १७ ते २० जुलै दरम्यान होणाऱ्या वार्षिक संमेलनापूर्वी कार्यकारी गट स्थापन होण्याची
शक्यता आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG : भारताच्या गोलंदाजांचा भेदक मारा, इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर संपुष्टात

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर

IND vs ENG: ज्यो रूट आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यात मैदानातच जोरदार बाचाबाची!

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यातील आज दुसऱ्या दिवशीओव्हल क्रिकेट मैदानावर एक मोठा

केनिंग्टन ओव्हल कसोटीत भारताचा पहिला डाव 'एवढ्या' धावांत आटोपला

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये

दुखापतीमुळे ख्रिस वोक्स पाचव्या कसोटीतून बाहेर

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये

आयुष्याला थकलो होतो, आत्महत्या करावीशी वाटत होती...धनश्रीसोबत घटस्फोटावर युझवेंद्र चहलचे विधान

मुंबई: भारताचा क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या वर्षी मार्चमध्ये घटस्फोट झाला होता. आता चहलने धनश्री

प्रो कबड्डी लीग २०२५ चे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : प्रो कबड्डी लीग २०२५ हंगामाची सुरुवात २९ ऑगस्ट रोजी विशाखापट्टणम येथील राजीव गांधी इनडोअर